CRIME: नवरदेवाने लग्नाच्याच दिवशी विहिरीत उडी मारून केली आत्महत्या, लग्नमंडपात शोककळा

216
CRIME: नवरदेवाने लग्नाच्याच दिवशी विहिरीत उडी मारून केली आत्महत्या, लग्नमंडपात शोककळा

लग्नाची सर्व जय्यत तयारी झाली, आता वऱ्हाड वाजत गाजत येऊन लग्न लागणार इतक्यात एक अतिशय धक्कादायक बातमी उघडकीस आली. ही घटना मंगळवारी, (१६ एप्रिल)सकाळी तळेगाव येथे घडली. या घटनेमुळे तळेगाव परिसरात खळबळ उडाली असून लग्नमंडपात शोककळा पसरली. (CRIME)

सुरज राजेंद्र वायकर (२८, रा. माळीनगर, तळेगाव) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. या घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजचे लग्न मंगळवारी, (१६ एप्रिल) होणार होते. घरात आणि नातेवाईकांमध्ये लग्नाची धामधूम सुरू होती. नवरीच्या हातावर मेंदी रंगली, लग्नाची सर्व तयारी यथासांग पार पडली आणि इतक्यात लग्नाच्याच दिवशी सकाळी सुरजने त्याच्या मामांना फोन करून ‘मला लग्न करायचे नाही.’, असे सांगितले. मामांना असे सांगून तो घराबाहेर पडला.

(हेही वाचा – भाजपाचे उमेदवार Ram Satpute आणि Ranjit Singh Naik-Nimbalkar यांनी भरले उमेदवारी अर्ज  )

घरात त्याने कोणालाही कुठे जाणार आहे, हे सांगितले नाही. घरातील मंडळींच्या सुरज कुठेतरी निघून गेला आहे, हे लक्षात येताच त्यांनी त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू केली, पण सुरज कुठेच सापडला नाही. काही वेळानंतर घरापासून काही अंतरावर वाण्याचा माळा येथील विहिरीजवळ सुरजची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी काही स्वयंसेवकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला. तेव्हा सुरजचा मृतदेह विहिरीत सापडला. या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.