Conservation of forts : राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विचारमंथन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असल्याने, राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

869
Conservation of forts : राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विचारमंथन

प्राचीन गड-किल्ल्याचे संवर्धन व्हावे यासाठी नेहमीच मागणी केली जाते. मात्र, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. असे अनेकदा समोर आले आहे. राज्यातील ऐतिहासिक गड किल्ले आणि गडांचे संवर्धन व्हावे यासाठी आता रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील (Ramniranjan Jhunjhunwala College) इतिहात विभाग व शिक्षणाय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुढाकार घेण्यात आला आहे. (Conservation of forts)

(हेही वाचा – विखे पाटलांच्या पिढ्या समजून घ्यायच्या असतील तर… ; Dr. Sujay Vikhe Patil यांचा शरद पवारांवर हल्लाबोल)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असल्याने, घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील (RJ College) इतिहात विभाग (Department of History) व शिक्षणाय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील किल्ले या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन (Organization of one day state level conference on Forts in Maharashtra) करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे (Dr. Tejas Garge) यांनी केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात गर्गे यांनी जागतिक वारशांसाठी नव्याने नामनिर्देशित झालेल्या गडकिल्ले संदर्भात माहिती व निर्देशनासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेचे सविस्तर महत्व पटवून दिले. तसेच वारसा जतन करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले. (Conservation of forts)

(हेही वाचा – विखे पाटलांच्या पिढ्या समजून घ्यायच्या असतील तर… ; Dr. Sujay Vikhe Patil यांचा शरद पवारांवर हल्लाबोल)

या दुर्गसंवर्धनावरील परिसंवादाचे सूत्रसंचालन, पुरातत्त्व शास्त्रज्ञ व इतिहासकार डॉ. कुरुष दलाल यांनी केले. त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत प्रश्न विचारून परिसंवादात सहभागी झाले. तर दुर्ग अभ्यासक व पुरातत्त्व संशोधक डॉ. सचिन जोशी, वास्तुविशारद व वारसा संवर्धन सल्लागार राहुल चेंबूरकर तसेच डॉ. तेजस गर्गे या तज्ज्ञ मंडळींकडून बहुमूल्य माहिती उपस्थित श्रोत्यांसाठी उपलब्ध झाली. दुर्ग संवर्धनासाठी इच्छाशक्ती, जनजागृती, लोकसहभाग, अभ्यासूवृत्ती व योग्य मार्गदर्शनाची तसेच आर्थिक बळाची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष या परिसंवादात मांडले गेले. 

या परिषदेमध्ये संवर्धन आर्किटेक तेजस्विनी आफळे यांनी दुर्ग संवर्धन प्रक्रियेतील विविध टप्पे सांगितले. जैवविविधता तज्ञ आनंद पेंढारकर यांनी किल्ल्यांच्या परिसरातील जैवविविधता व त्याच्या संरक्षण संवर्धनाचे महत्त्व सांगितले, तर किल्ले अभ्यासक व लेखक अमित सामंत यांनी किल्ल्यांवरील जलव्यवस्थापन या विषयावर सखोल सादरीकरण केले. तसेच महेंद्र गोवेकर यांनी नकाशातून दुर्ग भ्रमंती हा विषय मांडताना किल्ल्यांच्या नकाशाचे व महत्त्व पटवून दिले. (Conservation of forts)

(हेही वाचा – Mumbai South Central Constituency : दोन्ही उमेदवारांच्या मालमत्तेत ५.४० कोटींची वाढ)

या परिषदमध्ये शोधनिबंध सादरीकरण्याच्या सत्रात राज्यभरातून आलेल्या अभ्यासकांनी किल्ल्यांच्या संबंधित वेगवेगळ्या विषयांवर केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. तसेच या परिषदेचा समारोप करताना श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाहक सुधीर थोरात यांनी दुर्ग संवर्धनातून संस्कृती संवर्धनाची आवश्यकता, तसेच त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न यावर सहभागी श्रोत्यांना मार्गदर्शन केले. तसेच या परिषदेचे मुख्य योगदान कमलाकर इंदुलकर व राहुल मेश्राम यांचे होते. दरम्यान, शिवस्तुती गाऊन या परिषदेचा समारोप करण्यात आला.  (Conservation of forts)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.