भाजपाचे उमेदवार Ram Satpute आणि Ranjit Singh Naik-Nimbalkar यांनी भरले उमेदवारी अर्ज  

संकल्प यात्रेत तप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून, कार्यकर्ते महायुतीच्या जयजयकारासह ‘जय श्रीराम’ चे नारे

132
भाजपाचे उमेदवार Ram Satpute आणि Ranjit Singh Naik-Nimbalkar यांनी भरले उमेदवारी अर्ज  
भाजपाचे उमेदवार Ram Satpute आणि Ranjit Singh Naik-Nimbalkar यांनी भरले उमेदवारी अर्ज  

भारतीय जनता पार्टी (BJP) पक्षाचे सोलापूर राखीव लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते (Ram Satpute) आणि माढा सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik-Nimbalkar) यांनी दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सामान्य जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांचे कोणी वाकडे करू शकत नाही, असा दावा फडणवीस यांनी केला. 

(हेही वाचा – UPSC चा निकाल जाहीर; देशात कोण आहे प्रथम क्रमांकावर?)

एप्रिल-मे महिन्यात कडक्याच्या उन्हात, पारा चाळिशीच्या पुढे जात असताना, सोलापूर राखीव लोकसभेचे उमेदवार (Lok sabha Election 2024) आमदार राम सातपुते यांची संकल्प यात्रा (Sankalpa Yatra) निघाली. नंतर लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह कार्यकते यात्रेत दाखल झाले. दरम्यान, या संकल्प यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून, कार्यकर्ते महायुतीच्या जयजयकारासह ‘जय श्रीराम’ चे नारे लावत होते. 

(हेही वाचा – AC Sarkar : ब्रह्मगिरीवर उभारला समांतर सरकारचा स्तंभ; नक्षलवाद्यांशी संबंध ?)

जिल्हाधाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल 

सोलापूर लोकसभेसाठी (Solapur Lok sabha 2024) आमदार राम सातपुते यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. तर माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे निवडणूक अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उमेदवारी अर्ज भरताना पक्षातील नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.   

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.