Madanjeet Singh : भारतीय डिप्लोमॅट, फोटोग्राफर आणि लेखक मदनजीत सिंह

१९५३ साली मदनजीत सिंह यांनी भारतीय परराष्ट्र सेवा विभागात काम करायला सुरुवात केली. त्यांनी युगोस्लाव्हिया, ग्रीस, इटली, स्वीडन, लाओस, डेन्मार्क, स्पेन, यूएसएसआर आणि साऊथ व्हिएतनाम येथे काऊन्सिल जनरल म्हणून अशा अनेक देशांमध्ये काम केले. (Madanjeet Singh)

113
Madanjeet Singh : भारतीय डिप्लोमॅट, फोटोग्राफर आणि लेखक मदनजीत सिंह

मदनजीत सिंह (Madanjeet Singh) यांचा जन्म १९२४ साली लाहोर येथे झाला. ते एक भारतीय डिप्लोमॅट, पेंटर, फोटोग्राफर आणि लेखक होते. १९४२ सालच्या इंग्रजांविरुद्ध छोडो भारत या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. १९४७ साली भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्या वेळी मदनजीत सिंह यांनी दिल्ली येथील रेफ्युजी कॅम्प्समध्ये लोकांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून काम केले होते. (Madanjeet Singh)

१९५३ साली मदनजीत सिंह (Madanjeet Singh) यांनी भारतीय परराष्ट्र सेवा विभागात काम करायला सुरुवात केली. त्यांनी युगोस्लाव्हिया, ग्रीस, इटली, स्वीडन, लाओस, डेन्मार्क, स्पेन, यूएसएसआर आणि साऊथ व्हिएतनाम येथे काऊन्सिल जनरल म्हणून अशा अनेक देशांमध्ये काम केले. त्यानंतर मदनजीत सिंह यांनी १९८२ साली युनेस्कोमध्ये सामील झाले. त्याआधी आशिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि युरोप येथे भारताचे राजदूत म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. (Madanjeet Singh)

(हेही वाचा – Mumbai Disaster Management Control Room : मुंबईच्या कानाकोपऱ्यात महापालिकेची नजर; २४ विभाग कार्यालयातून सीसीटीव्ही वर लक्ष)

मदनजीत सिंह यांनी केलं ‘हे’ पुस्तक प्रकाशित 

१९९५ साली युनेस्कोने सांप्रदायिक सलोखा आणि समाजात शांतता राखण्यासाठी ‘युनेस्को-मदनजीत सिंह पुरस्कार’ देण्याचे जाहीर केले. २००० साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिनाच्या निमित्ताने मदनजीत सिंह यांची युनेस्कोचे सद्भावना दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. मदनजीत सिंह यांचं पाहिलं पुस्तक १९५२ साली इन्स्टिट्यूट ऑफ द मिडल अँड फार ईस्ट यांनी रोम येथे प्रकाशित केलं होतं. (Madanjeet Singh)

‘इंडियन स्कल्पचर इन ब्रॉंझ अँड स्टोन’ असं त्या पुस्तकाचं नाव होतं. या पुस्तकाने मदनजीत सिंह (Madanjeet Singh) यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी युरोपियन भाषेचा अभ्यास केला होता. तसेच त्यांनी रोम युनिव्हर्सिटी येथे लिओनेल्ला व्हेंच्युरी अंतर्गत युरोपियन कला इतिहासाचा अभ्यासही केला होता. २००० साली त्यांना युनेस्कोने जे सद्भावना दूत हे पद दिले होते. ते त्यांनी आमरण सांभाळले. (Madanjeet Singh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.