IPL 2024, Dharamsala Pitch : धरमशालाची नवीन हाय-ब्रीड खेळपट्टी आयपीएल आयोजनासाठी तयार

IPL 2024, Dharamsala Pitch : हिमाचल प्रदेशमधील धरमशाला इथं देशातील पहिली हाय-ब्रीड खेळपट्टी तयार करण्यात आली आहे 

179
IPL 2024, Hybrid Cricket Pitch : धरमशाळातील मैदानातील हाय-ब्रीड खेळपट्टी वापरासाठी खुली
IPL 2024, Hybrid Cricket Pitch : धरमशाळातील मैदानातील हाय-ब्रीड खेळपट्टी वापरासाठी खुली
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या या हंगामात पंजाब किंग्जचा (Punjab Kings) संघ आपले दोन सामने हिमाचल प्रदेशमधील धरमशाला इथं खेळणार आहे. यात यजमान संघ पंजाबचा असेल. धरमशाला मैदान हे तिथलं निसर्ग सौंदर्य आणि थंड वातावरणामुळे खेळपट्टीत मिळारा स्विंग यासाठी प्रसिद्ध आहे. पण, यंदा आयपीएल दरम्यान या मैदानावरील नवीन खेळपट्टीची परीक्षा होणार आहे. ही खेळपट्टी हाय-ब्रीड म्हणजे थोडं नैसर्गिक गवत आणि बाकी कृत्रिम गवताने बनलेली आहे. म्हणूनच तिला हाय-ब्रीड असं म्हणतात. (IPL 2024, Dharamsala Pitch)

(हेही वाचा- AC Sarkar : ब्रह्मगिरीवर उभारला समांतर सरकारचा स्तंभ; नक्षलवाद्यांशी संबंध ?)

देशातील ही पहिली हाय-ब्रीड खेळपट्टी असून आयपीएल दरम्यान तिची चाचणी होणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने देशात पहिल्यांदा हा प्रयोग करण्याचं ठरवलं आहे. नेदरलँड्समधील सिस-ग्रास या कंपनीने ही खेळपट्टी तयार केली आहे. ‘हाय-ब्रीड खेळपट्टीमुळे देशातील क्रिकेट बदलणार आहे. हे तंत्रज्जान क्रिकेटमध्ये मोठे बदल घडवून आणेल,’ असा विश्वास हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आरपी सिंग (RP Singh) यांनी व्यक्त केला आहे. (IPL 2024, Dharamsala Pitch)

हाय-ब्रीड खेळपट्टीवर नैसर्गिकरित्या वाढवलेल्या गवताबरोबरच पॉलिमर तुकड्यांनी बनलेलं कृत्रिम गवतही असतं. त्यामुळे खेळपट्टी लवकर खराब होत नाही. तसंच तिच्यातील स्विंग किंवा स्पिन जास्त काळ टिकतो. खेळपट्टीवर चेंडू अनियमित उसळत नाही. एकतर अशी खेळपट्टी दीर्घकाळ टिकते. ग्राऊंड्समनचं काम त्यामुळे कमी होतं. (IPL 2024, Dharamsala Pitch)

(हेही वाचा- Mumbai Disaster Management Control Room : मुंबईच्या कानाकोपऱ्यात महापालिकेची नजर; २४ विभाग कार्यालयातून सीसीटीव्ही वर लक्ष )

यापूर्वी इंग्लंडमध्ये अशा हाय-ब्रीड खेळपट्ट्यांचा वापर झालेला आहे. तिथे टी-२०, एकदिवसीय क्रिकेट तसंच स्थानिक ४ दिवसीय सामन्यांमध्ये या खेळपट्ट्यांचा वापर होतो. भारतातही पहिल्यांदा अशी खेळपट्टी फक्त देशांतर्गत सामन्यातच वापरली जाणार आहे. धरमशालातील खेळपट्टी तयार झाली की, तेच यंत्र पुढे अहमदाबाद आणि मुंबईत जाणार आहे. तिथेही हाय-ब्रीड खेळपट्टीचा प्रयोग करण्यात येईल. (IPL 2024, Dharamsala Pitch)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.