Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध परवान्यांसाठी एक खिडकी कक्ष

72
First Time Voter : साडेचार टक्के तरुण, वयोवृद्ध ठरवणार उमेदवारांचे भवितव्य

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार (Political parties, candidates) व त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे याकरिता एक खिडकी (सुविधा कक्ष) जिल्हास्तरीय कक्ष जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सोलापूर या कार्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे तसेच सर्व विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तथा नोडल अधिकारी सुविधा समितीचे दादासाहेब घोडके यांनी दिली. (Lok Sabha Election 2024)

जिल्हास्तरीय एक खिडकी (सुविधा कक्ष) मध्ये संपूर्ण लोकसभा मतदारसंघ अथवा एकापेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघासाठी नोंदणीकृत राजकीय पक्ष, नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी, उमेदवार / प्रतिनिधी यांचे विविध परवानग्यांसाठी (वाहन, रॅली, प्रचारसभा, कोपरा सभा, पदयात्रा, मेळावा इ.) अर्ज सादर करता येईल. तसेच सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी (संबंधित विधानसभा मतदारसंघासाठी) यांचे स्तरावरील एक खिडकी कक्षामध्ये त्या-त्या विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील विविध परवानग्यांसाठी अर्ज करता येतील. उमेदवार / पक्ष प्रतिनिधी यांना सुविधा पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेता येईल. विविध परवानगीसाठी अर्ज सादर करताना अर्जासोबत खर्चाबाबतच्या अनुसूची डी-१ प्रमाणे माहिती सादर करणे आवश्यक आहे.

(हेही पहा – Kandukuri Veeresalingam : समाजसुधारक आणि लेखक कंदुकूरी वीरेशलिंगम)

परवानगीसाठी अर्ज सादर करण्याची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी ५.०० वाजेपर्यंत आहे. परवानगीसाठीचा अर्ज प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतंत्ररित्या सादर करण्यात यावा. परवानगीसाठीचा अर्ज किमान 48 तास आधी करणे आवश्यक आहे. उमेदवाराचे / पक्षांचे कार्यक्रम, रॅली, मिरवणुक इत्यादीच्या परवानगीचे अर्ज 7 दिवस अगोदर दाखल करणे आवश्यक आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व राजकीय पक्ष / उमेदवार / प्रतिनिधी यांना विहित तरतुदीनुसार आवश्यक त्या सर्व परवानगी घेवून प्रचार करण्याचे आणि आदर्श आचारसंहिता पालन करण्याचे आवाहन केले आहे. आज अखेर एक खिडकी कक्षामध्ये विविध राजकीय पक्ष / प्रतिनिधी यांचे मार्फत प्राप्त १२ अर्जांवर कार्यवाही करून आवश्यक ती परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तथा नोडल अधिकारी सुविधा समितीचे घोडके यांनी कळविले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.