Places to Visit in Indore : इंदूरमध्ये या आणि ‘या’ खास ठिकाणांना भेट द्या!

स्मार्ट सिटी मिशनच्या पहिल्या टप्प्यांतर्गत २० शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित केली जाणार असून इंदूर देखील या पहिल्या टप्प्यात येते. २०२१ च्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या निकालांमध्ये इंदूरला सलग पाचव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून स्थान मिळाले आहे. (Places to Visit in Indore)

103
Places to Visit in Indore : इंदूरमध्ये या आणि 'या' खास ठिकाणांना भेट द्या!

इंदूर (Indore) हे मध्य प्रदेशातील एक अतिशय मनोरंजक आणि ऐतिहासिक शहर आहे. येथे पर्यटकांना विविध ठिकाणे पाहायला मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या “स्मार्ट सिटी मिशन” मध्ये १०० भारतीय शहरांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी इंदूरलाही स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले जाणार आहे. स्मार्ट सिटी मिशनच्या पहिल्या टप्प्यांतर्गत २० शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित केली जाणार असून इंदूर (Indore) देखील या पहिल्या टप्प्यात येते. २०२१ च्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या निकालांमध्ये इंदूरला सलग पाचव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून स्थान मिळाले आहे. (Places to Visit in Indore)

तर या सुंदर आणि स्वच्छ शहराला भेट तर द्यावीच लागेल. मग चला तर जाणून घेऊया इंदूरला गेल्यावर कोणकोणत्या महत्वाच्या ठिकाणांना भेट द्यायला हवी : (Places to Visit in Indore)

इंदूरचा राजवाडा :

इंदूरचा राजवाडा पॅलेस ही एक भव्य आणि ऐतिहासिक वास्तू आहे. हा सात मजली राजवाडा असून तो राजेशाही भव्यतेचा उत्कृष्ट नमुना आहे. येथे तुम्हाला पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई ओळकर यांची मूर्ती, एक कृत्रिम धबधबा आणि सुंदर कारंजे पहायला मिळतील. (Places to Visit in Indore)

लालबाग पॅलेस :

२८ एकर विस्तीर्ण परिसरात पसरलेला हा राजवाडा होळकर घराण्यातील राज्यकर्त्यांचा राजेशाही थाट दर्शवतो. पॅलेसचे बांधकाम तुकोजीराव होळकर यांच्या काळात १८८६ मध्ये सुरू झाले आणि १९२१ मध्ये पूर्ण केले. आता हे एक संग्रहालय म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये दुर्मिळ नाण्यांचा संग्रह तर आहेच, त्याचबरोबर मराठा साम्राज्य आणि होळकर राजवंशातील काही उत्कृष्ट कलाकृती देखील आहेत. (Places to Visit in Indore)

(हेही वाचा – Baramati Lok Sabha : बारामतीत चाललंय तरी काय? पवार कुटुंबातीलच आता तिसरी महिला निवडणुकीच्या रिंगणात)

सराफा मार्केट :

इंदूरचे सराफा मार्केट खूपच प्रसिद्ध आहे. पर्यटकांना आकर्षित करणारं हे केंद्र आहे. इथले पोहे, जिलेबी आणि दाल-बाफला खूपच प्रसिद्ध आहे. हे ठिकाण व्यवसायासाठी सुद्धा प्रचलित आहे. तसेच इथल्या स्ट्रीट फूडचा आनंद लुटू शकता. (Places to Visit in Indore)

अटलबिहारी वाजपेयी प्रादेशिक उद्यान :

अटल बिहारी वाजपेयी प्रादेशिक उद्यान हे इंदूर विकास प्राधिकरणाने विकसित केले आहे. उद्यानात संगीत कारंजे, जेट कारंजे, कलाकारांचे गाव, भूलभुलैया, फ्रेंच बाग, जैव-विविधता उद्यान, धुके कारंजे, फास्ट फूड झोन, नौकाविहार आणि “मालवा क्वीन” नावाची मिनी क्रूझ दोन डेक ८० जंपसह आहे. तसेच एक रेस्टॉरंट आणि खाजगी पार्टी रुम्स देखील आहेत. (Places to Visit in Indore)

कमला नेहरू प्राणीसंग्रहालय :

कमला नेहरू प्राणीसंग्रहालय हे इंदूर प्राणीसंग्रहालय या नावाचे देखील ओळखले जाते. ४००० चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेले इंदूरमधील सर्वात जुने प्राणी संग्रहालय आहे. सफेद वाघ, हिमालयीन अस्वल आणि पांढरे मोर या महत्वाच्या प्रजाती इथे आढळतात, इंदूर प्राणीसंग्रहालय हे प्राणी, वनस्पती आणि त्यांचे अधिवास यांच्या प्रजनन, संवर्धन आणि प्रदर्शनाचे केंद्र आहे. (Places to Visit in Indore)

मेघदूत गार्डन : 

शहरातील विजयनगर परिसरात मेघदूत गार्डन आहे. २००१ मध्ये या गार्डनचे नूतनीकरण करण्यात आले. ग्राउंड हाऊस लॉन, प्रकाशमय आणि नृत्यमय कारंजे आणि सुंदर बाग आहेत. सुप्रसिद्ध फॉर्च्यून लँडमार्क आणि सयाजी हॉटेल या उद्यानापासून खूपच जवळ आहेत. (Places to Visit in Indore)

मंडवगड किल्ला :

इंदूरपासून हाकेच्या अंतरावर असलेला मंडू किल्ला म्हणजेच मंडवगड किल्ला हा पर्यटकांच्या आकर्षणाचा मानबिंदू आहे. हा किल्ला त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्या अद्वितीय कारागिरीसाठी देखील ओळखला जातो. (Places to Visit in Indore)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.