Michael Slater in Police Custody : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटर गंभीर आरोपांवरून पोलिसांच्या ताब्यात

Michael Slater in Police Custody : स्लेटरवर विनयभंग, मारहाण, गळा दाबून गुदमरवणे यासारखे १९ आरोप आहेत.

105
Michael Slater in Police Custody : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटर गंभीर आरोपांवरून पोलिसांच्या ताब्यात
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर क्रिकेटपटू मायकेल स्लेटरवर (Michael Slater) एका महिलेनं केलेल्या विविध तक्रारींवरून क्वीन्सलंड पोलिसांनी अटक केली आहे. ५४ वर्षीय स्लेटरवर हिंसाचार, गळा दाबून गुदमरवणे, रात्रीच्या वेळी वाईट हेतूने घरात घुसणे यासारखे १९ आरोप आहेत. तक्रारदार महिलेचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे. विविध डेट्सच्या दरम्यान हे गुन्हे स्लेटरने केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. क्वीन्सलंडच्या सत्र न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आणि त्यानंतर आरोपांचं गांभीर्य पाहून न्यायाधीशांनी स्लेटरला (Michael Slater) ताब्यात घेण्याचे आदेश दिले. ऑस्ट्रेलियातील द गार्डियन वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. (Michael Slater in Police Custody)

(हेही वाचा – AC Government Of India : गडचिरोलीत एसी सरकारचा उन्माद; मतदान घेणे सरकारसमोर आव्हान; कुणाची आहे ही संघटना?)

पुढचा काही काळ तुरुंगात काढावा लागणार 

गेल्यावर्षी ५ डिसेंबर ते १२ एप्रिल दरम्यान स्लेटरने हे गैरवर्तन केलं आहे. सनशाईन कोस्ट शहरातील नूसा हेड्स इथून गेल्या शुक्रवारी स्लेटरला (Michael Slater) स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. ऑस्ट्रेलियात घरगुती हिंसाचाराला जामीन नाही. त्यामुळे स्लेटरला पुढचा काही काळ तुरुंगात काढावा लागणार आहे. (Michael Slater in Police Custody)

५४ वर्षीय स्लेटर ऑस्ट्रेलियासाठी ७४ कसोटी खेळला आहे आणि यात त्याने ४२ धावांच्या सरासरीने ५,३१२ धावा केल्या आहेत. तर ४२ एकदिवसीय सामन्यांत त्याने २४ धावांच्या सरासरीने ९२४ धावा केल्या आहेत. १९९३ ते २००३ या कालावधीत तो ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. २००४ पासून ते टीव्ही समालोचकाच्या भूमिकेत दिसत होते. (Michael Slater in Police Custody)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.