मुंबई ते गडचिरोली प्रवास आता अवघ्या १० तासांत; DCM Eknath Shinde यांच्याकडून राज्याच्या विकासाचा ‘गेमचेंजर’ आराखडा सादर

72
'एका टिप्पणीने महाराष्ट्राचे राजकारण तापले'; शिंदेंनी Congress ला थेट इशारा दिला
'एका टिप्पणीने महाराष्ट्राचे राजकारण तापले'; शिंदेंनी Congress ला थेट इशारा दिला
  • प्रतिनिधी

DCM Eknath Shinde             ​महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘दि हिंदू कॉन्क्लेव्ह’मध्ये महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासाचा जो विस्तृत आराखडा मांडला, तो राज्याच्या कायापालटाचे संकेत देणारा आहे. मुंबई ते थेट गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत विकासाचा महामार्ग उभारून राज्यातील प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. या महामार्गामुळे मुंबई ते गडचिरोलीचा प्रवास आता केवळ ९ ते १० तासांत पूर्ण होऊ शकणार आहे. (DCM Eknath Shinde)

(हेही वाचा – US Iran Deal: अमेरिका-इराण संघर्ष अखेर थांबणार? शांतता कराराचा अंतिम मसुदा तयार असल्याची चर्चा)

​केवळ महानगरांचा विकास न करता, दुर्गम आणि आदिवासी भागांना औद्योगिक प्रगतीशी जोडण्यावर सरकारचा विशेष भर आहे. गडचिरोलीतील नक्षलवाद नियंत्रणात आल्यानंतर, तिथे आता मोठ्या उद्योगांचे जाळे विणले जात आहे. कोनसरी आणि सुरजागड येथे तब्बल ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे स्टील प्रकल्प उभे राहत आहेत, ज्यामुळे हजारो तरुणांना स्थानिक स्तरावरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने उभारलेले कौशल्य विकास केंद्र हजारो विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन उद्योजक घडवत आहे. ​मुंबई आणि महानगर प्रदेशाचा (MMR) चेहरामोहरा बदलण्यासाठी ४ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प युद्धपातळीवर सुरू आहेत. ‘६० मिनिटांची मुंबई’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मेट्रोचे विस्तीर्ण जाळे, अटल सेतू, कोस्टल रोड आणि वाढवण बंदरासारखे प्रकल्प गतीने पूर्ण केले जात आहेत. सॅटेलाईट शहरांना स्वयंपूर्ण आर्थिक केंद्रे बनवण्याचे सरकारचे नियोजन आहे. (DCM Eknath Shinde)

(हेही वाचा – कल्याण-डोंबिवली विकासासह रोजगाराचे केंद्रबिंदू बनणार; खासदार Dr. Shrikant Shinde यांचा विश्वास)

​गृहनिर्माण क्षेत्रातही क्रांतिकारक बदल घडवत, २०३० पर्यंत ३५ लाख घरांचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. ‘धारावी पुनर्विकास’ हा जगातील सर्वांत मोठा प्रकल्प ठरत असून, मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी ‘नेत्रम’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिक्रमणांवर करडी नजर ठेवली जात आहे. पायाभूत सुविधांच्या या महाकाय उभारणीत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सेंट्रल पार्क, नमो गार्डन्स आणि क्लायमेट रेझिलियन्स उपक्रमांवरही सरकार तितकाच भर देत आहे. मुंबई ते गडचिरोली हा ‘कोस्ट टू फॉरेस्ट’ प्रवास राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. (DCM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.