Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी चालकांनो, १५ ऑगस्टपर्यंत ‘मराठी’ शिकलात तरच परवाना? राज्य सरकारचा मोठा निर्णय

59
प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात बैठक.
Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी चालकांनो, १५ ऑगस्टपर्यंत 'मराठी' शिकलात तरच परवाना? राज्य सरकारचा मोठा निर्णय
  • प्रतिनिधी

Pratap Sarnaik             ​मुंबईसह संपूर्ण राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य होणार आहे. प्रवाशांशी संवाद साधताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार, अमराठी भाषिक चालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले असून, त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. (Pratap Sarnaik)

(हेही वाचा – India Cyprus deal: भारतीय युवकांसाठी युरोपात नोकरीच्या नव्या संधी? PM मोदी-निकोस करारात द्विपक्षीय सहकार्यावर भर)

​प्रशासनाच्या नियोजनानुसार, परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. रिक्षा संघटना आणि स्थानिक शाखांमध्ये ही केंद्रे उपलब्ध असतील. सुमारे ४ हजार शिक्षकांच्या माध्यमातून चालकांना मराठीचे धडे दिले जाणार आहेत. हे प्रशिक्षण चालकांच्या सोयीनुसार शनिवार आणि रविवार या दिवशी चार तासांच्या सत्रांमध्ये पूर्ण करायचे आहे. यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीसाठी मराठी भाषा विभागाने २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची तयारी दर्शवली आहे. (Pratap Sarnaik)

(हेही वाचा – NEET-UG 2026: पेपरफुटी प्रकरणी पुणे कनेक्शन पुन्हा चर्चेत; प्राध्यापक मनिषा हवालदार अटकेत)

​प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर चालकांची छोटी तोंडी परीक्षा घेतली जाणार असून, यशस्वी चालकांना परिवहन विभागामार्फत अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल. केवळ सरकारी स्तरावरच नव्हे, तर ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या सेवांवरील वाहनांवरही मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी स्टिकर्स आणि बॅनर्स लावले जाणार आहेत. १५ ऑगस्टची ही डेडलाईन ओलांडल्यास चालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता रिक्षा-टॅक्सी चालकांना वेळेत मराठीचे किमान ज्ञान आत्मसात करणे अनिवार्य झाले आहे. (Pratap Sarnaik)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.