Pakistan statement on India : स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये राजनैतिक आणि सामरिक पातळीवर सातत्याने तणाव राहिला आहे. दोन्ही देशांमध्ये अनेकदा सशस्त्र संघर्षही झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध जवळपास अत्यल्प पातळीवर आहेत. अशा तणावपूर्ण वातावरणात, पाकिस्तानच्या लष्करातील एका वरिष्ठ प्रवक्त्याने भारताची सातत्याने वाढत असलेली लष्करी क्षमतेची ताकद मान्य केली आहे. तसेच, भारतासोबत कोणत्याही प्रकारच्या लष्करी किंवा शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत उतरण्याची पाकिस्तानची भूमिका नसल्याचेही स्पष्ट केले आहे. (Pakistan)
जनरल अहमद शरीफ नेमकं काय म्हणाले?
आंतरराष्ट्रीय मीडिया संस्था ‘अल अरेबिया इंग्लिश’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांना भारताच्या वाढत्या संरक्षण क्षमतेबाबत प्रश्न विचारण्यात आला.
भारत आपल्या हवाई संरक्षण यंत्रणा, क्षेपणास्त्र क्षमता आणि पारंपरिक हल्ल्यांची मारक क्षमता वाढवत असल्याबाबत पाकिस्तानला किती चिंता आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्यांनी, पाकिस्तान भारताच्या लष्करी क्षमतेचा पूर्ण आदर करत असल्याचे सांगितले. भारत सरकार संरक्षण साधनसामग्री आणि शस्त्रसाठा आधुनिक करण्यासाठी मोठी गुंतवणूक करत असल्याचीही पाकिस्तानला जाणीव असल्याचे त्यांनी म्हटले.
मात्र, पाकिस्तानचे संपूर्ण लक्ष आपल्या संरक्षणात्मक क्षमता मजबूत करण्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही शेजारी देशाविरोधात पाकिस्तानची आक्रमक भूमिका नसल्याचेही त्यांनी सांगितले. संरक्षण क्षमता वाढवण्याचा अर्थ भारतासोबत शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत उतरणे असा होत नसल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्याने स्पष्ट केले. (Pakistan)
स्वदेशी संरक्षण उत्पादनावर भारताचा भर
भारत सरकार ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या माध्यमातून स्वदेशी संरक्षण उत्पादनाला वेग देत आहे. संरक्षणाच्या गरजांसाठी परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करून देशातच आधुनिक लष्करी उपकरणे आणि प्लॅटफॉर्म तयार करण्यावर भर दिला जात आहे. (Pakistan)
गेल्या वर्षी पाकिस्तानविरोधात स्वीकारलेल्या कठोर भूमिकेनंतर आणि सुरक्षाविषयक उपाययोजना वाढवल्यानंतर भारताच्या या सामरिक प्रयत्नांना आणखी वेग मिळाला आहे. संभाव्य दोन आघाड्यांवरील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी देशाच्या लष्करी क्षमतांमध्ये सातत्याने सुधारणा केली जात आहे.
भारताने वर्ष 2025 मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील लक्ष्यित दहशतवादी ठिकाणांवर लष्करी कारवाई केली होती. (Pakistan)
संरक्षण चाचण्या आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम
मिळालेल्या माहितीनुसार, May 2025 मध्ये देशात आधुनिक नवदुर्गा डिफेन्स टेस्टिंग रेंजची पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पासाठी 1,460 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
याशिवाय, ‘प्रोजेक्ट कुशा’ अंतर्गत भारताने स्वदेशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. भविष्यात त्याची मारक क्षमता 400 किलोमीटरपर्यंत वाढवण्याची योजना असल्याचे सांगितले जाते.
सरकारने अलीकडेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) पारंपरिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे भारतीय खासगी कंपन्यांना हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे अत्याधुनिक शस्त्र प्रणालींच्या निर्मितीत देशातील खासगी क्षेत्राला मोठी भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे. (Pakistan)
भारताची हवाई संरक्षण यंत्रणा
भारताच्या सध्याच्या संरक्षण कवचात आकाश, आकाश-NG, QRSAM आणि VSHORADS यांसारख्या स्वदेशी संरक्षण प्रणालींचा समावेश आहे.
याशिवाय भारत-रशिया सहकार्याने विकसित होणारी ब्रह्मोस आणि भारत-इस्रायल संयुक्त उपक्रमातील MRSAM यांसारख्या क्षेपणास्त्रांमुळे भारताची मारक क्षमता आणखी वाढते.
अग्नि आणि K-Series मधील पाणबुडीवरून डागता येणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे भारताच्या सामरिक अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमतेचा महत्त्वाचा भाग आहेत. (Pakistan)
हेही वाचा: Disha Salian Case मध्ये नवा ट्विस्ट; दिशाचे वडील थेट ‘मातोश्री’वर जाणार, नेमके आरोप काय?
रशियासोबत संरक्षण सहकार्याला आणखी बळ
स्वदेशी संरक्षण उत्पादनासोबतच भारत पारंपरिक भागीदार रशियासोबतही संरक्षण सहकार्य मजबूत करत आहे. BRICS शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्ली दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. (Pakistan)
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने भारतीय हवाई दलातील 260 Su-30MKI विमानांसाठी सुमारे 11 अब्ज डॉलरच्या ‘सुपर सुखोई’ आधुनिकीकरण कार्यक्रमाचा प्रस्ताव दिला आहे.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात 84 विमानांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. यामध्ये प्रगत इंजिनचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
याशिवाय, रशियाने भारतात पाचव्या पिढीच्या Su-57 स्टेल्थ फायटर जेटचे संयुक्त उत्पादन, S-400 एअर डिफेन्स सिस्टिमसाठी भारतात देखभाल आणि दुरुस्तीची सुविधा तसेच अत्याधुनिक S-500 प्रणालीचा पर्यायही सुचवला आहे. (Pakistan)
भारताचा AMCA प्रकल्पही वेगाने पुढे
दुसरीकडे, भारत आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर Advanced Medium Combat Aircraft (AMCA) प्रकल्पाद्वारे पाचव्या पिढीचे फायटर जेट विकसित करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.
याउलट, संरक्षण तज्ज्ञांच्या मते, लष्करी आधुनिकीकरणाच्या बाबतीत पाकिस्तान अजूनही मागे आहे. आपल्या सामरिक गरजांसाठी पाकिस्तान मुख्यतः चीन आणि तुर्कीसारख्या देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. (Pakistan)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community


