Operation Soan : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

सद्दाम आणि मुस्तफा अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे

3
Operation Soan
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई. फोटो सौजन्य: IANS

Operation Soan :  जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील माजल्टा परिसरात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सोआन’ दरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. सद्दाम आणि मुस्तफा अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये एक AK असॉल्ट रायफल (4 मॅगझिनसह), एक M4 कार्बाइन (3 मॅगझिनसह), एक ग्लॉक पिस्तूल (2 मॅगझिनसह) आणि 4 ग्रेनेड यांचा समावेश आहे. (Operation Soan)

हेही वाचा: Nepal Flood Updates : पुरानंतर 6,150 जण अजूनही बेपत्ता; ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह, समोर येतंय धक्कादायक वास्तव

जम्मू-काश्मीर पोलिसांचा थेट इशारा

ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट करत कठोर संदेश दिला. ‘तुम्ही पळू शकता, पण लपून राहू शकत नाही,’ असे पोलिसांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी उशिरा माजल्टा परिसरात संशयास्पद हालचाली आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले. त्यानंतर अचूक गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू झाला. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दोन्ही दहशतवादी ठार झाले. (Operation Soan)

दरम्यान, परिसरात आणखी कोणता दहशतवादी लपून बसला आहे का, याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. सेना, पॅरा स्पेशल फोर्सेस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून अतिरिक्त सुरक्षा दलांच्या मदतीने संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

दुर्गम भागात सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई

उधमपूरमधील माजल्टा परिसरात झालेली ही कारवाई दुर्गम आणि जंगल क्षेत्रात राबवण्यात आली. या संयुक्त मोहिमेत भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) सहभाग होता. खराब हवामान, अवघड भूप्रदेश आणि कमी दृश्यमानता अशा अडचणी असतानाही सुरक्षा दलांनी कारवाई सुरू ठेवली. परिसरात आणखी दहशतवादी लपलेले असण्याची शक्यता लक्षात घेऊन शोधमोहीम आणि निगराणी वाढवण्यात आली आहे. (Operation Soan)

हेही पाहा:

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.