महायुतीत ‘तडजोडी’चा काळ संपला? Vidhan Parishad Election च्या जागांवरून मोठा ‘कलगीतुरा’ रंगण्याची चिन्हे

81
Vidhan Parishad Election च्या तोंडावर राजकीय भूकंप; बंडखोर खासदाराच्या मुलाच्या उमेदवारीचा पेच
Vidhan Parishad Election च्या तोंडावर राजकीय भूकंप; बंडखोर खासदाराच्या मुलाच्या उमेदवारीचा पेच
  • प्रतिनिधी

​Vidhan Parishad Election              राज्यातील आगामी विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुकांचे बिगूल वाजले असून, या जागा वाटपावरून महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये भाजपाने वरचढ भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेला वारंवार तडजोड करावी लागली होती, मात्र यावेळी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत ७ जागांवर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – US Iran Deal: अमेरिका-इराण संघर्ष अखेर थांबणार? शांतता कराराचा अंतिम मसुदा तयार असल्याची चर्चा)

​मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने भाजपासमोर आपल्या जुन्या ५ आणि नव्या २ अशा एकूण ७ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने संयम पाळला होता, परंतु विधान परिषदेत आता कोणतीही तडजोड न करता ७ जागा मिळवण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. दुसरीकडे, भाजपाने केवळ ३ ते ४ जागा देण्याची तयारी दर्शवल्याने दोन्ही पक्षांमधील दरी वाढली आहे. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – ​’गिधाडांना’ घरी बसवणारी जनता आता ‘झुरळांचा’ बंदोबस्त करणार; BJP चा संजय राऊतांवर थेट हल्लाबोल)

​या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २५ मे पासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर, जागा वाटपावरून निर्माण झालेला हा पेच महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकांमध्ये जागांच्या वाटपावरून पक्षात असलेली नाराजी लक्षात घेता, यावेळी शिवसेनेचे नेतृत्व सात जागांच्या मागणीवर ठाम राहून आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. आता यावर भाजपा काय भूमिका घेतो आणि महायुतीतील हे ‘जागांचे घोडं’ कुठे अडलंय, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. (Vidhan Parishad Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.