Online Trading Scam : सावध रहा, सतर्क रहा; सायबर गुन्हे शाखेकडून नागरिकांना आवाहन

'ऑनलाईन शेअर ट्रेंडिंग' (Online Trading Scam) च्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखा तसेच सायबर पोलिस ठाण्यात दाखल होत आहे. प्रत्येक तक्रारीत फसवणूक झालेली छोटी रक्कम नसून लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या आहेत.

236
Deep Fake Video : बॉलिवूड पाठोपाठ शेअर्स बाजाराला डीपफेक तंत्रज्ञानाचा फटका

‘ऑनलाईन शेअर्स ट्रेंडिंग’चे भरमसाठ मोबाईल ॲप्लिकेशन आले आहेत. या ट्रेंडिंग ॲप्लिकेशनने अनेकांना भुरळ घातली आहे. झटपट पैसे कमविण्याच्या नादात अनेकांचे बँक खाते रिकामे होत आहे. वेगवेगळ्या नावाने असलेल्या या ट्रेंडिंग ॲप्लिकेशनमध्ये कुठले अधिकृत आहे आणि कुठले बोगस ॲप आहेत, हे ओळखता येत नसल्यामुळे अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक होत आहे. या ॲप्लिकेशनच्या जाहिराती फेसबुक, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अशा फसव्या ॲप्लिकेशन, अनोळखी लिंक, अनोळखी मोबाईल क्रमांकवरून येणाऱ्या संदेशांपासून सावध रहा, सतर्क रहा आणि संशयास्पद लिंक टाळा, असे आव्हान मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडून व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येत आहे. (Online Trading Scam)

लोकांना भुरळ घालणाऱ्या या जाहिरातींमुळे अनेक जण हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करतात, सुरुवातीला फायदा करून देणारे हे बोगस ट्रेंडिंग ॲप्लिकेशन तुमचे बँक खाते केव्हा रिकामे करतात हे कळत नाही. या बोगस ट्रेंडिंग ॲप्लिकेशनचा मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण देशभरात सुळसुळाट झाला आहे. मुंबईतील पोलीस ठाण्यात सध्या ट्रेंडिंग ॲप्लिकेशनमधून फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून या बोगस ॲप्लिकेशन पासून लोकांनी दूर रहावे, यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडून (Mumbai Police Cyber Crime Branch) व्हिडिओच्या माध्यमातून “ऑनलाइन ट्रेडिंग स्कॅम” या नवीन सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात सार्वजनिक सूचना लोकांना देण्यात येत आहे. (Online Trading Scam)

ऑनलाईन फसवणूकीच्या तक्रारींचा पाऊस…

‘ऑनलाईन शेअर ट्रेंडिंग’ (Online Trading Scam) च्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखा तसेच सायबर पोलिस ठाण्यात दाखल होत आहे. प्रत्येक तक्रारीत फसवणूक झालेली छोटी रक्कम नसून लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांकडून हा फसवणुकीचा नवीन ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. तक्रारदाराकडून वेळीच तक्रार दाखल केल्यावर खात्यातून जाणारी ही रक्कम थांबवता येते, परंतु बहुतांश तक्रारी उशिरा दाखल होत असल्यामुळे फसवणूक झालेली रक्कम सायबर गुन्हेगारांकडून काढली जाते. या नवीन सायबर गुन्हेगारीच्या ट्रेंडमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. (Online Trading Scam)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘स्वीप’ अंतर्गत प्रशिक्षण)

अशी होते शेअर्स ट्रेंडिंग मधून फसवणूक…

या नवीन सायबर फसवणुकीत सायबर गुन्हेगारांकडून सावज हेरण्यासाठी फसवणूक झालेल्या पीडितांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा व्हॉट्सॲपवर मोफत ट्रेडिंग टिप्स क्लासेसच्या जाहिराती पाठविण्यात येतात, त्यांनी जाहिरातीवर क्लिक केल्यावर त्यांना एका अज्ञात व्हॉट्सॲप ग्रुपवर ऍड केले जाते. फसवणूक करणारे या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सावजाशी संवाद साधतात आणि त्यांना स्टॉकची खरेदी आणि विक्री करण्यासाठी मोफत ट्रेडिंग टिप्स देऊन गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतात. काही दिवसांनंतर, फसवणूक करणाऱ्यांनी दिलेले ट्रेडिंग ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करण्यासाठी लोकांना शेअर्सच्या ट्रेडिंग आणि प्रचंड नफा मिळविण्यासाठी पुढील मार्गदर्शनासाठी सांगितले जाते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितली.

या गुन्ह्यात फसवणूक झालेला पीडित व्यक्ती INSECG, CHS-SES, SAAI, SEQUOIA आणि GOOMI सारखे अनुप्रयोग स्थापित करतात, जे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) अंतर्गत नोंदणीकृत नसतात, ते फसवणूक करणाऱ्यांच्या शिफारशींच्या आधारे नोंदणी करतात आणि स्टॉक ट्रेडिंग सुरू करतात. शेअर्स खरेदी करण्याची रक्कम फसवणूक करणाऱ्यांनी नमूद केलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते आणि ती रक्कम डिजिटल वॉलेटमध्ये बनावट नफा दाखवला जातो. जेव्हा पीडित व्यक्ती डिजिटल वॉलेटमधून त्यांचा ‘नफा’ काढण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना सांगितले जाते की, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांचा नफा सुमारे ५० लाख किंवा त्याहून अधिक असेल. याला कंपनीचे धोरण समजून, फसवणूक करणाऱ्यांच्या सूचनेनुसार पीडित लोक सतत गुंतवणूक करतात. एका वेळी, पीडितांना कमावलेल्या नफ्यासाठी कर रक्कम भरण्यास सांगितले जाते, पीडितेने नकार दिल्यास, सर्व कम्युनिकेशन थांबवले जाते, त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात येते. (Mumbai Police Cyber crime branch)

सावध रहा सतर्क रहा, संशयास्पद लिंक टाळा…

‘सावध रहा! सतर्क रहा! संशयास्पद लिंक टाळा’, अशी सूचना मुंबई सायबर गुन्हे शाखेकडून एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात येत आहे. लोकांना गुंतवणूक घोटाळ्याबद्दल जागरुक राहण्याचा सल्ला दिला आणि त्यांना ‘अज्ञात नंबरवरून संशयास्पद लिंक्स, व्हॉट्सॲप कॉल्स आणि संदेश टाळावे’ असे आवाहन मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहे. तसेच कोणत्याही सायबर-संबंधित गुन्ह्यांच्या बाबतीत, जनतेला नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (www.cybercrime.gov.in) तक्रार नोंदवावी किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन १९३० वर कॉल करण्याचा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे. (Online Trading Scam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.