Kalyan Lok Sabha : थेट मुख्यमंत्र्यांच्या मुलाला दिले आव्हान; कोण आहेत वैशाली दरेकर ?

Kalyan Lok Sabha : महायुतीच्या जागावाटपात श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची जागा वाचवण्यासाठी मुख्यमंत्री भरपूर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये महायुतीतून श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारी वैशाली दरेकर यांच्यात लढत पाहायला मिळू शकते.

244
Kalyan Lok Sabha : थेट मुख्यमंत्र्यांच्या मुलाला दिले आव्हान; कोण आहेत वैशाली दरेकर ?
Kalyan Lok Sabha : थेट मुख्यमंत्र्यांच्या मुलाला दिले आव्हान; कोण आहेत वैशाली दरेकर ?

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर कल्याण मतदारसंघात (Kalyan Lok Sabha) उबाठा गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीचा उमेदवार अजून घोषित झाला नसला, तरी येथे विद्यमान खासदार मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आहेत. महायुतीच्या जागावाटपात श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची जागा वाचवण्यासाठी मुख्यमंत्री भरपूर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये महायुतीतून श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारी वैशाली दरेकर यांच्यात लढत पाहायला मिळू शकते.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘स्वीप’ अंतर्गत प्रशिक्षण)

कल्याणसारख्या प्रतिष्ठेच्या लढतीसाठी उबाठा गटाने ज्यांच्यावर विश्वास दाखवला आहे, त्या वैशाली दरेकर (Vaishali Darekar) कोण आहेत, हे वाचा…

शिवसेना-मनसे-शिवसेना प्रवास
  • वैशाली दरेकर 2009 मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणुकीला उभ्या होत्या. त्यांना एक लाखाहून अधिक मते मिळाली होती.
  • 2010 ला कल्याण-डोंबिवली मनपामध्ये मनसेतर्फे नगरसेविका म्हणून निवडून आल्या.
  • त्या वेळी त्यांनी विरोधी पक्षनेत्या म्हणून कल्याण डोंबिवली मनपामध्ये पद भूषवले.
  • 2009 च्या अगोदर या शिवसेनेत होत्या.
  • पुन्हा मनसे सोडून त्या शिवसेनेत गेल्या. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही त्या निष्ठावंत म्हणून उबाठा गटात (ubt group) राहिल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.