Bhavana Gawali : मी दावेदारी सोडली नाही; राजश्री पाटील यांच्या घोषणेनंतरही भावना गवळी ठाम

Bhavana Gawali : 'सर्वेक्षणाचा निकाल काहीही असो पण मी गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ वाशिममधून निवडून येत आहे. या मतदारसंघात माझी मोठी ताकद आहे. त्यामुळे मी पुन्हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकते', असे भावना गवळी यांचे म्हणणे आहे.

286
Bhavana Gawali : मी दावेदारी सोडली नाही; राजश्री पाटील यांच्या घोषणेनंतरही भावना गवळी ठाम
Bhavana Gawali : मी दावेदारी सोडली नाही; राजश्री पाटील यांच्या घोषणेनंतरही भावना गवळी ठाम

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या यवतमाळ-वाशिम लोकसभा (Yavatmal-Washim Lok Sabha) मतदारसंघाबाबत शिवसेनेने बुधवार, ३ एप्रिल रोजी महत्त्वाचा निर्णय घेतला. शिवसेनेने गेल्या पाच टर्मपासून यवतमाळच्या खासदार असलेल्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्याऐवजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील (Rajashree Patil) यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) उमेदवारी देण्यात आली आहे. राजश्री पाटील या गुरुवारी यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.

(हेही वाचा – Uddhav Thackeray : भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका; उद्धव ठाकरेंचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन)

मतदारसंघात माझी ताकद मोठी – भावना गवळी 

शिवसेनेने केलेल्या सर्वेक्षणात भावना गवळी यांच्याविषयी चांगले मत आले नसल्याच्या चर्चा माध्यमांत रंगल्या होत्या. त्यामुळे त्यांचे तिकिट कापले जाईल, अशी शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी भावना गवळी बरेच प्रयत्न करतांना दिसून येत होत्या. त्यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांनी भेट घेतली होती. ‘सर्वेक्षणाचा निकाल काहीही असो पण मी गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ वाशिममधून निवडून येत आहे. या मतदारसंघात माझी मोठी ताकद आहे. त्यामुळे मी पुन्हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकते’, असे भावना गवळी यांचे म्हणणे होते. असे असूनही राजश्री पाटील यांना यवतमाळची उमेदवारी देण्यात आली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करणार

या निर्णयानंतरही भावना गवळी यांनी उमेदवारीचा आग्रह कायम ठेवला आहे. भावना गवळी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले की, मी यवतमाळ-वाशिम मतदारसंघावरील दावेदारी अद्याप सोडलेली नाही. मी आता माझ्या मतदारसंघामध्ये परत जात आहे. मी यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

यवतमाळ-वाशिममध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भावना गवळी (Bhavana Gawali) या महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजश्री पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करून अर्ज भरणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भावना गवळी यांनी खरोखरच अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्यास राजश्री पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.