NDA ४०० पारचे लक्ष्य सहज पार करणार; Amit Shah आपल्या दाव्यावर ठाम

आमच्या समोर तुल्यबळ विरोधक नाही. त्यामुळे मतदानावर एक प्रकारचा परिणाम होतो आहे. दोन टप्प्यांमध्येच आम्ही १०० हून जास्त जागांवर जिंकून आघाडी घेतली आहे, असे अमित शाह म्हणाले.

84
Lok Sabha Election 2024: ...तर ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष फुटलेच नसते, अमित शहांनी मुलाखतीत केलं 'हे' महत्त्वाचं वक्तव्य

भाजपा आणि एनडीए पूर्णपणे ट्रॅकवर आहे. ४ जूनच्या दिवशी म्हणजेच निकालाच्या दिवशी तुम्हाला दिसेल की दुपारी १२.३० च्या आधी एनडीए खासदार संख्या ४०० पार करणार. ४०० पारचे लक्ष्य आम्हाला मोठे वाटत नाही. ते सहज पार होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या दोन टप्प्यांविषयी काय वाटते आणि लोकसभा निवडणूक कशी सुरु आहे याबाबत अमित शाह (Amit Shah) यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

(हेही वाचा भारतात काँग्रेसचे कमकुवत सरकार येण्यासाठी पाकिस्तान प्रार्थना करतेय; PM Narendra Modi यांचा घणाघात)

पंतप्रधान मोदींनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला 
आमच्या समोर तुल्यबळ विरोधक नाही. त्यामुळे मतदानावर एक प्रकारचा परिणाम होतो आहे. दोन टप्प्यांमध्येच आम्ही १०० हून जास्त जागांवर जिंकून आघाडी घेतली आहे. त्यामुळे ४०० पारचे लक्ष्य आम्हाला फार मोठे वाटत नाही, असे अमित शाह (Amit Shah) म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. भारतीयांचे भविष्य उज्ज्वल आहे असा विश्वास निर्माण करणे ही कायमच नेतृत्वाची जबाबदारी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात यशस्वी झाले आहेत. १३० कोटी भारतीयांमध्ये हा आत्मविश्वास दुणावला आहे की आपण जगात पहिल्या क्रमांकावर येऊ शकते. रामजन्मभूमी, नवीन आर्थिक धोरण, कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक संपवणे, फौजदारी कायद्यांमध्ये करण्यात आलेले बदल या महत्त्वाच्या निर्णयांमुळे हे शक्य होणार आहे. तसेच कोरोना सारख्या महामारीशी आपल्या देशाने खूप उत्तम प्रकारे सामना केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झाले ही जनभावना आहे, असेही अमित शाह (Amit Shah) म्हणाले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.