T20 World Cup 2024 : अमेरिकेतील टी-२० विश्वचषक स्पर्धा ही लॉस एंजलिस ऑलिम्पिकची नांदी

T20 World Cup 2024 : बेसबॉलच्या या देशात क्रिकेटही रुजेल असा विश्वास आयसीसीला वाटतो आहे. 

103
T20 World Cup 2024 : आयसीसीकडून सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, भारताचा एकमेव सराव सामना
  • ऋजुता लुकतुके

आगामी टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup) आयोजनाच्या निमित्ताने अमेरिकन लोकांची क्रिकेटशी ओळख होईल आणि तिथेही क्रिकेट रुजायला मदत होईल, असा विश्वास आयसीसीने बुधवारी व्यक्त केला आहे. जूनमध्ये वेस्ट इंडिजच्या बरोबरीने अमेरिकेतही टी-२० विश्वचषकाचं आयोजन होणार आहे. फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि डॅलस इथं ही स्पर्धा पार पडणार आहे. एरवी अमेरिकेत बेसबॉलचा बोलबाला आहे. पण, स्पर्धेच्या निमित्ताने इथं क्रिकेटही रुजेल, असं आयसीसीला वाटतंय. (T20 World Cup 2024)

‘अमेरिका ही जगातील सगळ्यात मोठी क्रीडाविषयक बाजारपेठ आहे. इथे लोकांना खेळ आवडतात. अशा देशात क्रिकेटने चंचूप्रवेश केला आहे हीच गोष्ट महत्त्वाची आहे. खेळाबद्दल उत्सुकता यापूर्वीच तयार झाली आहे,’ असं आयसीसीचे स्पर्धा संचालक ख्रिस टेटली मीडियाशी बोलताना म्हणाले. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : भारत – पाक सामन्यासाठी न्यूयॉर्कमधील नसॉ स्टेडिअम सज्ज )

क्रिकेटचा अमेरिकेत प्रसार करण्यासाठी ICC चे प्रयत्न सुरू

आता स्पर्धेमुळेच २०२८ च्या ऑलिम्पिकची हवा तयार होईल, असं आयसीसीला वाटतंय. कारण, २०१८ ला लॉस एंजलिस इथं होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये टी-२० (T20) प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. पण, देशात भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे लोक सोडले तर इतर कुणी फारसं क्रिकेट खेळत नाही. जवळच्या कॅरेबियन बेटांवरील लोक थोडंफार क्रिकेट खेळतात. पण, आता टी-२० विश्वचषकाच्या आयोजनामुळे लोक क्रिकेटबद्दल बोलू लागतील आणि त्याचा फायदा लॉस एंजलिसमधील क्रिकेट सामन्यांना गर्दी होण्यात होईल, असा आयसीसीचा अंदाज आहे. (T20 World Cup 2024)

क्रिकेटचा अमेरिकेत प्रसार करण्यासाठी आयसीसीचे (ICC) पद्धतशीर प्रयत्नही सुरू आहेत. यापूर्वी एकदाच क्रिकेट हा खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला गेला आहे. १९०० साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स हे दोनच संघ सहभागी झाले होते आणि यात ग्रेट ब्रिटनने बाजी मारली होती. (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.