भारतात काँग्रेसचे कमकुवत सरकार येण्यासाठी पाकिस्तान प्रार्थना करतेय; PM Narendra Modi यांचा घणाघात

गुजरातमधील आणंद येथे प्रचारसभेला पंतप्रधान मोदी संबोधित करत होते.

90

एकेकाळी दहशतवाद्यांची निर्यात करणारा देश आता पीठ आयात करण्यासाठी दारोदार फिरत आहे, ज्यांच्या हातात एकेकाळी बॉम्ब होता, त्यांच्या हातात आज भीकेचा कटोरा आहे. काँग्रेसचे कमकुवत सरकार दहशतवादाच्या सूत्रधारांना कागदपत्रे देत असे, पण मोदींचे मजबूत सरकार दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारते. योगायोग बघा, आज भारतात काँग्रेस कमकुवत होत चालली आहे. आता पाकिस्तानी नेते काँग्रेससाठी प्रार्थना करत आहेत,  असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला.

गुजरातमधील आणंद येथे प्रचारसभेला पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. काँग्रेस इथे मरत आहे आणि तिकडे पाकिस्तान रडत आहे. पाकिस्तानला भारतात कमकुवत सरकार हवे आहे, जसे 2014 पूर्वीचे सरकार होते, असे सरकार ज्याच्या अंतर्गत मुंबईत दहशतवादी हल्ले शक्य होते. ज्या वर्षांमध्ये आपल्या देशात काँग्रेसचे सरकार होते, त्या काळात पाकिस्तान मोठा झाला होता. आता पाकिस्तानच्या दहशतवादाचे टायर पंक्चर झाले आहे, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

(हेही वाचा PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभेतून काँग्रेसला तीन आव्हानं!)

काँग्रेस बनावट मालाची फॅक्टरी 

पाकिस्तान राजपुत्राला पंतप्रधान करण्यासाठी उतावीळ झाला आहे. पाकिस्तान आणि काँग्रेसमधील ही भागीदारी आता पूर्णपणे उघड झाली आहे. आज लोक विचारत आहेत की काँग्रेस इतकी वेडी का झाली आहे. आज काँग्रेस ही बनावट फॅक्टरी म्हणजेच बनावट मालाची फॅक्टरी बनली आहे. काँग्रेस मोहब्बत की दुकान म्हणत खोटा माल का विकतंय? काँग्रेसला कधीही एससी आणि एसटीची चिंता नाही. तर 90च्या दशकापूर्वी काँग्रेस ओबीसी आरक्षणाच्या बाजूने नव्हती, असेही मोदींनी (PM Narendra Modi) म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.