Ghatkopar Hoarding Accident : पीएपीचे पाप उद्धव ठाकरेंचेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

167
Ghatkopar Hoarding Accident : पीएपीचे पाप उद्धव ठाकरेंचेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
Ghatkopar Hoarding Accident : पीएपीचे पाप उद्धव ठाकरेंचेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुख्यमंत्री असताना धारावीसोबत शहरातील अन्य ठिकाणच्या प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये स्थायिक करण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही होते. बाहेरच्यांना इथे(मुलुंड) वसवून भाजप – शिवसेनेचा हा बालेकिल्ला फोडावा, असा राजकीय डाव उद्धव ठाकरेंना खेळायचा होता, असा खळबळजनक आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी मुलुंड येथील जाहीर सभेत केला. (Ghatkopar Hoarding Accident)

चार दिवसांपूर्वी घाटकोपर येथे हॉर्डींग दुर्घटना (Ghatkopar Hoarding Accident) घडली. अवैध होर्डिंग उभारण्याची परवानगी उद्धव ठाकरे सरकारने दिली होती. या दुर्घटनेत दगावलेल्यांचा अपघाती मृत्यू झालेला नसून हा खून आहे, हत्या आहे. आणि हे हत्याकांड उद्धव ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने घडले आहे, असा घणाघाती आरोप करताना हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा आम्ही शाबीत करून दाखवू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : तोपर्यंत एकाही नवीन जाहिरात फलकांना परवानगी नाही, महापालिका आयुक्तांनी केले जाहीर)

ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारार्थ मुलुंड पूर्वेकडील मिठागर मार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात चौफेर फटकेबाजी केली.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) धारावी, शिवाजी नगर आणि इतर भागातील प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये स्थायिक करण्यासाठी आग्रही असताना फक्त मिहीर कोटेचा त्यांना प्रखर विरोध करत होते. कारण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार मुलुंडमध्ये बाहेरच्यांची वसाहत तयार करून भाजप – शिवसेनेचा बालेकिल्ला फोडू पाहत आहेत, हा अंदाज मिहीर कोटेचा यांना होता. माजी खासदार किरीट सोमैया यांनी याबाबत न्यायालयात याचिका केली. न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा येईल मात्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सोबतीने बाहेरच्या प्रकल्पबाधितांचे कोणत्याही परिस्थितीत मुलुंडमध्ये स्थलांतर करणार नाही, तसे आम्ही नक्की केले आहे, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

(हेही वाचा – PM Narendra Modi : आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट खटा-खट; पंतप्रधान मोदींनी काढले राहुल गांधींचे विदेश दौरे)

उद्धव ठाकरे लाचार

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मतांसाठी लाचार झालेत. पाकिस्तानच्या झेंड्यासमोर त्यांना लोटांगण घालावे लागत आहे. अलीकडे त्यांनी जुलूस काढला. त्यात पाकिस्तानचे झेंडे फडकले. हाती मशाल चिन्ह घेतलेल्यांनी टिपू सुलतानाचा जयघोष केला. मुंबई, महाराष्ट्रात पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर राजकीय निवृत्ती घेऊन घरी बसेन, हे सांगण्याची हिंमत उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) उरलेली नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.