June 2024: महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डपर्यंत ‘हे’ ५ मोठे बदल, जाणून घ्या

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत सलग तिसऱ्या महिन्यात घट झाली आहे.

1321
June 2024: महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डपर्यंत 'हे' ५ मोठे बदल, जाणून घ्या

दर महिन्याला होणाऱ्या खर्चाचं बजेट एक तारखेलाच ठरवलं जातं. तुम्हीदेखील या महिन्याच्या बजेटची लिस्ट तयार केली असेल; पण तुम्हाला माहितीये का? जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी अनेक गोष्टींमध्ये बदल झाला आहे. या बदलामुळे महिन्याच्या खर्चातील गॅस सिलिंडरपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत अनेक गोष्टींवरील दर कमी झालेत. त्याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेऊ. (June 2024)

(हेही वाचा – Ajit Pawar: आमदार सुनील टिंगरेंची भूमिका संशयास्पद; अजितदादा म्हणाले… )

LPGगॅल सिलिंडरच्या किंमती
जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत सलग तिसऱ्या महिन्यात घट झाली आहे. 19 किलोची व्यावसायिक गॅस सिलिंडरची टाकी ७२ रुपयांनी स्वस्त झाली आहे. १ जूनपासून मुंबईत ६९.५० रुपयांनी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. त्यामुळे शनिवारपासूनची किंमत १६७६ रुपये इतकी असणार आहे. (June 2024)

ATFच्या किंमती कमी झाल्या
तेल विपणन कंपन्यांनी हवाई इंधनाच्या म्हणजेच Air Turbine Fuel (ATF)च्या किमतीदेखील कमी केल्या आहेत. IOCLदिलेल्या माहितीनुसार, हवाई इंधनाची किंमत मुंबईमध्ये 95,173.70 रुपये प्रति किलोलीटर होती. ती आता ८८,८३४.२७ रुपये प्रति किलोलीटर इतकी झाली आहे. दिल्लीमध्ये ९४,९६९.०१ रुपये प्रति किलोलीटर, तर कोलकात्यात १,०३, ७१५ रुपये प्रति किलोलीटर आणि चेन्नईत १,०३,७१५ रुपये प्रति किलोलीटर इतकी किंमत आहे. (June 2024)

SBI क्रेडिट कार्ड
महिन्याच्या पहिल्याच दिवशी क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडे SBI बँकचे क्रेडिट कार्ड असेल तर नवीन नियम काय आहेत ते जाणून घ्या. नव्या नियमानुसार, SBI क्रेडिट कार्डमध्ये सरकारी व्यवहारांवर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट आता बंद झाले आहेत. (June 2024)

बदललेला नियम SBIच्या पुढील कार्डसाठी लागू  – 

– SBI AURUM

– SBI Card ELITE

– SBI Card ELITE Advantage

– SBI Card Pulse

– SimplyCLICK SBI

ड्रायव्हींग लायसन्स
ड्रायव्हींग लायसन्स मिळवण्यासाठी आधी आरटीओमध्ये जावे लागत होते. यामध्ये नागरिकांचा बराच वेळ वाया जात होता. त्यामुळे आता आरटीओची मान्यता असलेल्या ड्रायव्हींग स्कूलमध्ये तुम्ही ड्रयव्हींग शिकत असाल तर तेथूनच तुम्हाला ड्रायव्हींग लायसन्स देखील दिले जाणार आहे. यामध्ये १८ वर्षांखालील मुलांना वाहन चालवण्यासाठी दिल्यास २५ हजारांचा दंड तसेच २५ वर्षांसाठी परवाना रद्द करण्यात येणार आहे.

आधार कार्ड अपडेट
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAIकडून ते मोफत केले जात होते. मात्र येत्या १४ जूनपर्यंतच याची मुदत देण्यात आली आहे. या तारखेनंतर जर तुम्ही आधारकार्ड अपडेट केले, तर त्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर ५० रुपये द्यावे लागतील. हा बदल १४ जूनपासून लागू होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.