Central Railway Mega Block: प्रवाशांचे ‘मेगा’हाल! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न

173
Central Railway Mega Block: प्रवाशांचे 'मेगा'हाल! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न
Central Railway Mega Block: प्रवाशांचे 'मेगा'हाल! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे (Thane) येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी (Central Railway Mega Block) गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या महामेगाब्लॉक (Mega Block) मध्य रेल्वेवरील (Central Railway) प्रवाशांचे हाल सुरू असतानाच आज, शनिवारी त्यात आणखी भर पडणार आहे. लोकलच्या तब्बल 534 फेऱ्या रद्द होणार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Central Railway Mega Block)

(हेही वाचा –Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेवरील ५३४ फेऱ्या रद्द! ३७ मेल-एक्स्प्रेस रद्द)

मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे (Central Railway Mega Block) सध्या ठाणे आणि त्यापुढील स्थानकांवर प्रचंड गोंधळाची स्थिती पाहायला मिळत आहे. शनिवारी (१ जून) सकाळच्याच वेळी दिवा स्थानकाच तुडूंब गर्दी पाहायला मिळाली. दिवा स्थानकातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये ही गर्दी पाहायला मिळाली. गर्दी असल्यामुळे रेल्वेचा दरवाजा बंद करण्यात आला होता. स्टेशनवरील प्रवाशांनी हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आणि तिथं एकच आरडाओरडा झाला. (Central Railway Mega Block)

(हेही वाचा –IndiGo Bomb Threat: चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटला बॉम्बने उडवण्याची धमकी, कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले?)

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी आणि ठाणे दरम्यान ब्लॉक काळात रेल्वे प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक असेल तरच रेल्वे प्रवास करावा. शक्य असल्यास रेल्वे प्रवास टाळावा असं स्पष्ट आवाहन करताना रेल्वे प्रशासनानं स्पष्ट सांगितल्यानुसार शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवसांच्या वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत. परिणामस्वरुप 534 लोकल आणि 37 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. (Central Railway Mega Block)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.