Lok Sabha Election 2024 : पुढील ३ दिवस अंदाज आणि अनुमानांचे !

124
Lok Sabha Election 2024 : पुढील ३ दिवस अंदाज आणि अनुमानांचे !
Lok Sabha Election 2024 : पुढील ३ दिवस अंदाज आणि अनुमानांचे !

लोकशाहीच्या निवडणुकांचं महापर्व यंदा २ महिन्यांपेक्षा अधिक काळ चाललं. या निवडणुकीच्या कालखंडात राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीदेखील झाडल्या गेल्या. शनिवारी, (१ जून) मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडत आहे. यानंतर शनिवारी सायंकाळपासून ते ४ जून रोजी निकाल लागेपर्यंत अनुमान आणि अंदाज लावले जातील. त्यात राजकीय पक्षांचे नेते आपापले दावे-प्रतिदावे करण्यात कुठेही कमी पडणार नाहीत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Ajit Pawar: आमदार सुनील टिंगरेंची भूमिका संशयास्पद; अजितदादा म्हणाले…)

शनिवारी शेवटच्या टप्प्याचं मतदान

निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर सायंकाळी ६ वाजल्यानंतर सर्वच वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल जाहीर केला जाणार आहेत. याआधी देशभरातील सट्टा बाजार अत्यंत तेजीत होता. या सट्टा बाजारावरूनदेखील लोकसभेच्या निकालांचे अंदाज राजकीय पक्षांचे कार्यकर्ते घेत होते. लोकसभेच्या प्रत्येक जागेवर राजकीय कार्यकर्ते आपापसात एकमेकांसमोर चर्चा करताना भिडताना दिसतील. (Lok Sabha Election 2024)

एक्झिट पोलपासून काँग्रेसने स्वतःला ठेवले अलिप्त…

१ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडत असताना सायंकाळी ६ वाजल्यापासून वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल डिबेट (exit poll debate) सुरू होतील. अर्थातच टप्प्याटप्प्याने सगळ्या वृत्तवाहिन्या एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर करतील. ते जाहीर होत असतानाच वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रवक्ते वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर डिबेटमध्ये सहभागी होतील; परंतु काँग्रेसने (Congress) मात्र रविवारी, (२ जून) कुठल्याही वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोलच्या डिबेट मध्ये भाग घ्यायचा नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- IndiGo Bomb Threat: चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटला बॉम्बने उडवण्याची धमकी, कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले?)

खरा निकाल ४जून रोजीच

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालाबाबत सर्वत्र अटकळ बांधली जात आहे आणि भारताच्या प्रत्येक गल्लीबोळात बसून निवडणूक चाणक्य आणि त्याचे भाकीत आपण ऐकत असतो; परंतु असे काही लोक आणि संस्था आहेत जे डेटा आणि संशोधनाच्या आधारे निवडणुकीच्या निकालांचा अंदाज लावतात. इंग्रजीत त्याला सेफोलॉजिस्ट म्हणतात आणि हिंदीत इलेक्शन एनालिस्ट म्हणतात. ९०च्या दशकात सॅटेलाइट टीव्हीच्या माध्यमातून एक्झिट पोल लोकांच्या घराघरांत पोहोचले. याआधी कित्येक वेळा मांडलेले एक्झिट पोल हे काहीसे खरे, तर बरेचसे चुकीचेदेखील निघालेले आहेत. असे असले तरी खरा निकाल, मात्र ४ जून रोजी जनतेसमोर येणार आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.