Archery World Cup 2024 : तिरंदाजी विश्वचषकात भारतीय संघ प्रशिक्षकांविना खेळला?

Archery World Cup 2024 : प्रशिक्षकांवर सामन्याच्या ठिकाणी फिरकण्यावर बंदी घालण्यात आली होती. 

85
Archery World Cup 2024 : तिरंदाजी विश्वचषकात भारतीय संघ प्रशिक्षकांविना खेळला?
  • ऋजुता लुकतुके

तिरंदाजीच्या विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा २३ ते २८ एप्रिल दरम्यान चीनच्या शांघायमध्ये पार पडला आणि भारताने यंदा ५ सुवर्ण पदकांसह विक्रमी ९ पदकंही जिंकली. पण, स्पर्धेच्या बहुतेक कालावधीत भारतीय संघ स्पर्धेच्या ठिकाणी प्रशिक्षकांविना खेळल्याचं आता उघड झालं आहे. जागतिक तिरंदाजी संघटनेनं भारतीय प्रशिक्षकांना स्पर्धेच्या ठिकाणी येण्यापासून बंदी घातली होती. (Archery World Cup 2024)

भारतीय प्रशिक्षकांनी काही सामने सुरू असताना प्रतिबंधित भागांमध्ये जाऊन खेळाडूंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वागणुकीमुळे आयोजक आणि जागतिक तिरंदाजी संघटनेनं प्रशिक्षकांवर दंडाची कारवाई तर केलीच. शिवाय स्पर्धेच्या ठिकाणी येण्यापासूनही त्यांना रोखलं. भारतीय प्रशिक्षकांना १,००० स्वीस फ्रँक म्हणजेच जवळ जवळ ९०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विश्वचषकाचा पुढील टप्पा कोरियात सुरू होण्यापूर्वी भारताने हा दंड भरणं अनिवार्य आहे. (Archery World Cup 2024)

(हेही वाचा – भारतात काँग्रेसचे कमकुवत सरकार येण्यासाठी पाकिस्तान प्रार्थना करतेय; PM Narendra Modi यांचा घणाघात)

प्रशिक्षकांच्या या भलत्या उत्साहामुळे रिकर्व्ह प्रकारात भारतीय पुरुषांनी ऐतिहासिक सुवर्ण जिंकलं, तेव्हाही खेळाडूंना प्रशिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं आहे. त्या दिवसापासून उर्वरित दोन दिवसही प्रशिक्षक खेळाडूंबरोबर राहू शकले नाहीत. विशेष म्हणजे भारतीय प्रशिक्षकांकडून एकदा ही चूक घडल्यावर त्यांना ताकीद देण्यात आली होती. पण, त्यानंतरही ही चूक घडतच राहिली. दुसऱ्यावेळी रेफरींनी भारतीय पथकावर किरकोळ दंडात्मक कारवाई केली. पण, तरीही भारतीय पथकातील कुणीही इतर खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या जोड्यांना या कारवाईबद्दल कळवलं नाही आणि ही चूक पुन्हा पुन्हा होत राहिली. त्यामुळे अखेर अख्ख्या भारतीय पथकावर ही कारवाई करण्यात आली. भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि तिरंदाजी असोसिएशन अशा दोनही संस्था झाल्या प्रकाराची चौकशी करत आहेत. (Archery World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.