Rajya Sabha MP Retirement : 54 खासदारांसह 9 केंद्रीय मंत्री राज्यसभेतून निवृत्त

Rajya Sabha MP Retirement : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह 54 राज्यसभा खासदार बुधवार, 3 एप्रिल रोजी राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. या सर्वच खासदारांचा कार्यकाळ आज संपला. तसेच केंद्रीय मंत्रीही राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या राज्यसभा सदस्य म्हणून प्रथमच सभागृहात प्रवेश करतील.

150
Rajya Sabha MP Retirement : 54 खासदारांसह 9 केंद्रीय मंत्री राज्यसभेतून निवृत्त
Rajya Sabha MP Retirement : 54 खासदारांसह 9 केंद्रीय मंत्री राज्यसभेतून निवृत्त

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि नऊ केंद्रीय मंत्र्यांसह 54 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत संपला आहे. यापैकी सात केंद्रीय मंत्र्यांसह 49 सदस्यांचा कार्यकाळ मंगळवारी संपला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बुधवार, ३ एप्रिल रोजी राज्यसभेतील त्यांची ३३ वर्षांची संसदीय कारकीर्द संपवणार आहेत. (Rajya Sabha MP Retirement)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) आणि नऊ केंद्रीय मंत्र्यांसह 54 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ मंगळवार आणि बुधवारी संपला आहे. यापैकी सात केंद्रीय मंत्र्यांसह 49 सदस्यांचा कार्यकाळ मंगळवारी संपला. उर्वरित पाच सदस्यांचा कार्यकाळ 3 एप्रिल रोजी संपणार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बुधवार, ३ एप्रिल रोजी राज्यसभेतील त्यांची ३३ वर्षांची संसदीय कारकीर्द संपवणार आहेत. ऑक्टोबर 1991 मध्ये ते प्रथमच वरच्या सभागृहाचे सदस्य झाले. ते 1991-1996 पर्यंत नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री आणि 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान होते.

(हेही वाचा – Shivsena Candidate : शिवसेनेने हिंगोलीत उमेदवार बदलला; हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम, तर यवतमाळमध्येही मोठा बदल)

सात केंद्रीय मंत्र्यांमध्ये शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री पुरषोत्तम रुपाला, माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचा समावेश आहे. माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल. मुरुगन यांचा कार्यकाळ मंगळवारी संपला. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा कार्यकाळ देखील आज संपला आहे.

केंद्रीय मंत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

अश्विनी वैष्णव वगळता हे सर्व केंद्रीय मंत्री लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) लढवत आहेत. वैष्णव आणि मुरुगन यांना आणखी एक राज्यसभेची मुदत देण्यात आली आहे. समाजवादी पक्षाच्या जया बच्चन, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज कुमार झा आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांचाही वरिष्ठ सभागृहातून निवृत्त झालेल्यांमध्ये समावेश आहे. यापैकी जया बच्चन आणि मनोज कुमार झा यांना त्यांच्या पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, अभिषेक मनु सिंघवी हिमाचल प्रदेशमधून निवडणूक हरले आहेत.

निवृत्त झालेले सर्व पक्षीय खासदार

राजस्थान – मनमोहन सिंग (INC), भूपेंद्र यादव (भाजप) ओडिशा – अश्विनी वैष्णव (भाजपा), प्रशांत नंदा, अमर पटनायक (बीजेडी) उत्तराखंड – अनिल बलूनी (भाजपा) गुजरात – मनसुख मांडविया (भाजपा), परशोत्तम रुपाला (भाजपा), नारनभाई राठवा (INC), अमी याज्ञिक (INC). महाराष्ट्र – व्ही मुरलीधरन (भाजपा), नारायण राणे (भाजपा), प्रकाश जावडेकर (भाजपा), कुमार केतकर (आयएनसी), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी), अनिल देसाई (शिवसेना- यूबीटी). मध्य प्रदेश – धर्मेंद्र प्रधान (भाजपा), एल मुरुगन (भाजपा), अजय प्रताप सिंग (भाजपा), कैलाश सोनी (भाजपा), राजमणी पटेल (INC).

कर्नाटक – राजीव चंद्रशेखर (भाजपा), एल हनुमंथैय्या (INC), GC चंद्रशेखर (INC), सय्यद नासिर हुसेन (INC). तेलंगणा – जोगिनिपल्ली संतोष कुमार (BRS), रविचंद्र वड्डीराजू (BRS), बी लिंगय्या यादव (BRS) पश्चिम बंगाल – अबीर रंजन बिस्वास (TMC), सुभाषीष चक्रवर्ती (TMC), मोहम्मद नदीमुल हक (TMC), शंतनू सेन (TMC), अभिषेक मनु सिंघवी (INC). बिहार – मनोज कुमार झा (RJD), अहमद अशफाक करीम (RJD), अनिल प्रसाद हेगडे (JDU), बशिष्ठ नारायण सिंह (JDU), सुशील कुमार मोदी (भाजप), अखिलेश प्रसाद सिंग (INC).

उत्तर प्रदेश – अनिल अग्रवाल (भाजपा), अशोक बाजपेयी (भाजपा), अनिल जैन (भाजपा), कांता कर्दम (भाजपा), सकलदीप राजभर (भाजपा), जीव्हीएल नरसिंह राव (भाजपा), विजय पाल सिंग तोमर (भाजपा), सुधांशू त्रिवेदी (भाजपा) आणि हरनाथ सिंह यादव (भाजपा), जया बच्चन (सपा).

आंध्रप्रदेश – कनकमेडला रवींद्र कुमार (टीडीपी), सीएम रमेश (भाजपा), प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी (वायएसआरसीपी) छत्तीसगड – सरोज पांडे (भाजपा) हरियाणा – डीपी वत्स (भाजपा) (Rajya Sabha MP Retirement)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.