Megablock : ‘या’ मार्गांवर ब्लॉक, काही लोकल रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

189
Railway Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर वेळापत्रक

मध्य रेल्वे, मुंबई विभाग २४.१२.२०२३ रोजी खालीलप्रमाणे विविध अभियांत्रिकी आणि देखभालाची कामे करिता उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेत आहे.

माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर (Megablock) सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथून डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार वळवण्यात येतील, माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल –

डाउन जदल मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Megablock) येथून सकाळी १०.२० वाजता सुटणारी बदलापूर लोकल असेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बदलापूर करिता दुपारी ३.३९ वाजता सुटेल.अप जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४.४४ वाजता पोहोचेल.पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत. (Megablock)

(हेही वाचा – Coronavirus : भारतात ४२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, चार जणांचा मृत्यू)

(बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित नाहीत)

(नेरुळ/बेलापूर-खारकोपर बंदर मार्ग वगळून)

ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत बंद –

सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी (Megablock) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी ठाणे येथे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत बंद राहतील.डाउन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि १०.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी पहिली लोकल दुपारी ३.१६ वाजता असेल आणि पनवेल येथे ४.३६ वाजता पोहोचेल. (Megablock)

(हेही वाचा – Bajrang Punia : कुस्तीपटू बजरंग पुनिया पद्मश्री पुरस्कार परत करणार)

ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ठाणे येथून दुपारी ४ वाजता असेल –

अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी (Megablock) शेवटची लोकल सकाळी १०.१७ वाजता पनवेल येथून सुटेल आणि ११.३६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतर सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी पनवेल येथून पहिली लोकल दुपारी ४.१० वाजता असेल आणि ५.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी ९.३९ वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ठाणे येथून दुपारी ४ वाजता असेल आणि पनवेल येथे ४.५२ वाजता पोहोचेल. (Megablock)

अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाणे येथे जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.४१ वाजता सुटेल आणि ठाणे येथे सकाळी ११.३३ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेल येथून ४.२६ वाजता (Megablock) सुटेल आणि ठाणे येथे संध्याकाळी ५.२० वाजता पोहचेल.

(हेही वाचा – Maharashtra : राज्यात सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवणार ;राज्य सरकारचा निर्णय)

मुंबई ते वाशी मार्गावर विशेष लोकल –

ब्लॉक (Megablock) कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी मार्गावर विशेष लोकल धावतील.ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे. (Megablock)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.