Surat Mumbai varsova Bridge : वर्सोवा पूलाची सूरत-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी स्थानिकांनीच केली खुली

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलाच्या सूरत-मुंबई मार्गीकेला सुरू करण्यास विलंब होत असल्याने स्थानिकांनीच ही मार्गिका खुली केली.

167
Surat Mumbai varsova Bridge : वर्सोवा पूलाची सूरत-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी स्थानिकांनीच केली खुली
Surat Mumbai varsova Bridge : वर्सोवा पूलाची सूरत-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी स्थानिकांनीच केली खुली

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवरील वर्सोवा पूलाची सूरत-मुंबई मार्गिका सुरू करण्यास उशीर झाल्याने वाहतूक कोंडीला कंटाळून स्थानिकांनीच ही मार्गिका शुक्रवारी (२२ डिसेंबर)  वाहतुकीसाठी खुली केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मात्र या प्रकाराबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. (Surat Mumbai varsova Bridge)

वर्सोवा खाडीवरील जुन्या पुलाच्या शेजारी नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या पूलाची मुंबई-सूरत ही मार्गिका २७ मार्च रोजी सुरू करण्यात आली होती. मात्र सूरत-मुंबई मार्गिकेचे काम विविध प्रकारच्या अडचणींमुळे रखडले होते. त्यामुळे दररोज ठाणे,मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा (Traffic Issue) सामना करावा लागत होता.  (Surat Mumbai varsova Bridge)

(हेही वाचा : Maharashtra : राज्यात सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवणार ;राज्य सरकारचा निर्णय 

वाहतूक कोंडीला कंटाळून घेतला निर्णय 

सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. काम पूर्ण होऊनही पूलाची मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका खुली केली जात नसल्याने अडचणी आधिक वाढत होत्या.त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी स्थानिक व काही संघटनांनी अचानक पुलावर एकत्र येऊन मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली. यानंतर दुसऱ्या मार्गीकेतून वाहनांची ये-जा सुरू झाली. नाताळच्या सणाच्या सुट्ट्या सुरू होत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आम्ही ही मार्गिका खुली केल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
महामार्ग प्राधिकरण अनभिज्ञ
तर ही मार्गिका स्थानिकांनी अचानक पुढाकार घेऊन मार्गिका खुली केल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला असला तरी हा पूल सुरू झाला याबाबत आम्हाला काही माहिती नसल्याचे प्राधिकरणाने सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.