Dawood Ibrahim : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला धक्का; रत्नागिरी आणि मुंबईतील मालमत्तेचा होणार लिलाव 

परकीय चलन कायदा (फेमा) अंतर्गत दाऊद इब्राहिमची ही संपत्ती जप्त करण्यात आली होती.

147
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव पार पडला, सर्वाधिक बोली २.०१ कोटी रुपये
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव पार पडला, सर्वाधिक बोली २.०१ कोटी रुपये
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या मुंबई आणि रत्नागिरी येथील मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. ५ जानेवारी २०२४ रोजी लिलाव करण्यात येणार आहे. परकीय चलन कायदा (FEMA) अंतर्गत दाऊद इब्राहिमची (Dawood Ibrahim) ही संपत्ती जप्त करण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची (Dawood Ibrahim) मुंबईतील मालमत्ता तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेले बंगले, आणि आंब्याच्या बागा फेमा कायदा (FEMA) अंतर्गत जप्त करण्यात आली होती. या मालमत्तेचा लिलाव नवीन वर्षाच्या सुरुवातीला ५ जानेवारी २०२४ रोजी सरकार मार्फत करण्यात येणार आहे. यापूर्वी सरकारने दाऊदच्या (Dawood Ibrahim) कुटुंबाच्या अनेक मालमत्तेचा लिलाव केला आहे. त्यात मुंबईतील फ्लॅट, रेस्टोरंट आणि गेस्ट हाऊसचा समावेश होता. या लिलावात रेस्टोरंट साडेचार कोटींना विकले गेले होते, साडेतीन कोटींना ६ फ्लॅट विकले गेले होते आणि ३ कोटी ५२ लाख रुपयांना गेस्ट हाऊस विकले गेले होते.
दरम्यान डिसेंबर २०२० मध्ये, दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) रत्नागिरीतील एका मालमत्तेचा लिलाव १ कोटी १० लाख रुपयांना करण्यात आला होता, त्यात दोन भूखंड आणि बंद पडलेला पेट्रोल पंप यांचा समावेश होता. खेड तालुक्यातील लोटे गावातील या मालमत्ता दाऊदची (Dawood Ibrahim) दिवंगत बहीण हसिना पारकर (Hasina Parkar) यांच्या नावावर नोंदवण्यात आल्या होत्या. एप्रिल २०१९ मध्ये नागपाडा येथील ६०० चौरस फुटाचा १ कोटी ८० लाख रुपयांत लिलाव करण्यात आला होता, तसेच २०१८ फेमा (FEMA) अधिकारी यांनी पाकमोडिया स्ट्रीट येथील दाऊदच्या मालमत्तेचा ७९.४३ लाख रुपयांच्या आरक्षित किंमतीसह लिलावात जाहीर केला होता तो फ्लॅट सैफी बुर्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट ने ३.५१ कोटींना विकत घेतला होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.