Bajrang Punia : कुस्तीपटू बजरंग पुनिया पद्मश्री पुरस्कार परत करणार

कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांनी निवड झाल्यामुळे चिडलेल्या बजरंगने हा निर्णय घेतला आहे

153
Bajrang Punia : बजरंग पुनिया पुन्हा एकदा कुस्ती फेडरेशनच्या विरोधात
  • ऋजुता लुकतुके

भारतीय कुस्ती फेडरेशनची गुरुवारी झालेली निवडणूक अजूनही गाजते आहे. फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांनी निवड झाल्यामुळे खेळाडूंचा एक गट नाराज आहे. गुरुवारी ऑलिम्पिक विजेती साक्षी मलिकने निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला. तर शुक्रवारी बजरंग पुनियाने पद्मश्री परत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.बजरंग पुरस्कार परत करण्यासाठी संसदेकडे निघालाही होता. त्यावर दिल्ली पोलिसांनी त्याला रोखलं.

बजरंग, साक्षी सहित विनेश फोगाट आणि काही राष्ट्रीय कुस्तीपटूंचा संजय सिंग यांना विरोध आहे. माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात या कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराची तक्रार करत जंतर मंतर इथं आंदोलनही केलं होतं.

(हेही वाचा – Ajit pawar : संभ्रम नको, मी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार नाही- अजित पवार)

खेळाडूंचा विरोध पाहता ब्रिजभूषण शरण यांचा मुलगा प्रतीक सिंग आणि त्यांचा जावई प्रवीण सिंग यांनी कुस्ती फेडरेशनची निवडणूक लढली नाही. पण, शरण यांचे धंद्यातील भागिदार आणि उत्तर प्रदेश कुस्ती फेडरेशनचे उपाध्यक्ष संजय सिंग यांच्यामागे आपली ताकद उभी केली.

संजय सिंग फेडरेशनचे अध्यक्ष झाले तरी ब्रिजभूषण यांचंच वर्चस्व फेडरेशनच्या कारभारावर राहणार अशी भीती व्यक्त करत खेळाडूंनी या निवडीला विरोध केला होता. त्यांचा पाठिंबा राष्ट्रकूल पदक विजेत्या अमिता शेरॉन हिला होता. पण, शेरॉनचा दणदणीत पराभव करत संजय सिंग निवडून आले.

त्यामुळे बजरंगने निषेध नोंदवण्यासाठी पद्मश्री परत करण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, केंद्रसरकारने बंजरंगची भूमिका ही वैयक्तिक भूमिका असल्याचं म्हटलं आहे. शुक्रवारी बजरंगला पंतप्रधानांची भेट मिळू शकली नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.