Ajit pawar : संभ्रम नको, मी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार नाही- अजित पवार

आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार भाजपच्या नव्हे तर राष्ट्रवादी घडयाळ या चिन्हावरच निवडणूक लढवतील असे अजित पवार यांनी सांगितले.

154
Election Commission of India च्या निकालाने विधानसभा अध्यक्षांचे काम सोपे, अजित पवार गट मजबूत

आम्ही आमची धर्मनिरपेक्ष भूमिका सोडलेली नाही, यशवंतराव चव्हाणांच्या विचारधारेवर आमचे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांकमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आमचे विरोधक अशा अफवा पसरवत असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (२२ डिसेंबर)  केला. तसेच राष्ट्रवादीच्या घडयाळ चिन्हावरच आम्ही निवडणूका लढविणार असल्याचे सांगत कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम लावली. (Ajit pawar)

आमच्यात कुठेही मॅच फिक्सिंग नाही

यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांपासून शरद पवारांसोबतच्या भेटीगाठीबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. या भेटीगाठी कौटुंबिक स्वरूपाच्या असतात. आम्ही कुटुंब म्हणून येतो. राजकरणात आम्ही आता पुढे गेलो आहोत. आता त्यात बदल होणार नाही. आमच्यात कुठेही मॅच फिक्सिंग नाही. कुठेही आमच्या सोबत आलेल्यांना फसवणार नाही असे पवार यांनी ठामपणे सांगितले तर माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही असेही ते म्हणाले. (Ajit pawar)

(हेही वाचा : Hindu temple vandalised in the US : अमेरिकेतील हिंदू मंदिरावर खलिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला)

जनता मोदींनाच निवडून देईल
देशात वेगवेगळ्या विचारधारा असलेले पक्ष काम करत असतात त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही. आज देशात नरेंद्र मोदी यांच्यासारखे दुसरे नेतृत्व नाही. अशा नेत्याच्या पाठीशी सर्वानी उभे राहिले पाहिजे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.