Ghatkopar Hoarding: दुर्घटनेनंतर मनपा अॅक्शन मोडवर; रेल्वे, बीपीटी हद्दीतील होर्डिंग्जनाही नोटिसा 

काही दिवसांत या होर्डिंगवर कारवाई केली नाही तर या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. असे विधान पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले.

138
Ghatkopar Hoarding: दुर्घटणेनंतर मनपा अॅक्शन मोड वर; रेल्वे, बीपीटी हद्दीतील होर्डिंग्जनाही नोटिसा 

घाटकोपरच्या होर्ल्डिंग दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding) मृतांचा आकडा १९ वर पोहोचला आहे आहे. होर्डिंग दुर्घटनास्थळी अद्यापही मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा आहे. लोखंडी ढिगाऱ्याखाली २५ ते ३० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अजून अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोल पंपावर होर्डिंग पडलं, तिथे मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा असून तो उपसण्याचं काम सुरु आहे. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती असल्याने बचावकार्य सुरु आहे. बचावकार्याला आणखी २४ तास लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अनधिकृत होर्डिंग  (unauthorized hoarding) बाबतपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ३० होर्डिंगना स्टॅबलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) (Hoarding stability certificate) नसल्याची बाब समोर आली आहे. या होर्डिंग्जना नोटिसा पाठविण्यात येणार आहे. अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी  (Municipal Commissioner Bhushan Gagrani) यांनी दिली आहे.  (Ghatkopar Hoarding)

शहरातील सर्व होर्डिंग पालिकेच्या रडारवर आलेले असताना याबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करून घेण्यात येणार येणार आहे. तसेच रेल्वे हद्दीतील ४५ आणि बीपीटी हद्दीतील १२ अशा एकूण ५७ महाकाय होर्डिंग्जना पालिकेकडून डिझास्टर अॅक्टअंतर्गत नोटीस पाठविण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसांत या होर्डिंगवर कारवाई केली नाही तर या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, ‘अटी पूर्ण न केल्यास नूतनीकरण नाही’ अशी माहिती आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; आणखी ३० ते ४० जण अडकल्याची भीती)

शहरात पालिका क्षेत्रात १०२५ महाकाय होर्डिंग असून त्यांपैकी सर्वाधिक फलक अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भागात आहेत. यामधील जवळपास ३० होर्डिंग्जसाठी स्थैर्यता प्रमाणपत्राची अट पूर्ण न केल्याची बाब समोर आली आहे. त्याच्यावर आता पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. अधिकृत किंवा अनधिकृत कोणत्याही प्रकारचे होर्डिंग लावताना जागेच्या संरचनात्मक स्थैर्याचा मुद्दा मात्र अद्यापपर्यंत दुर्लक्षितच राहिला आहे. घाटकोपर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बेकायदा महाकाय फलकांमुळे धोका पुढे आला आहे. (Ghatkopar Hoarding) 

(हेही वाचा – Mumbai Crime : ‘कॅफे म्हैसूर’ च्या मालकाला लुटणाऱ्या पोलिसांसह ६ जणांना ७ दिवसांची पोलीस कोठडी)

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर होर्डिंगखाली अडकलेले ९१ जण जखमी झाले आहेत. अनेक जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.  घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर २५० टन वजनाचे अनधिकृत जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं. या दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.   (Ghatkopar Hoarding)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.