India Chief Coach : मुख्य प्रशिक्षक पदासाठी रिकी पाँटिंग आणि स्टिफन फ्लेमिंग ही नवीन नावं समोर

बीसीसीआय आता परदेशी प्रशिक्षकाचा विचार करत असल्याचं समजतंय

112
India Chief Coach : मुख्य प्रशिक्षक पदासाठी रिकी पाँटिंग आणि स्टिफन फ्लेमिंग ही नवीन नावं समोर
India Chief Coach : मुख्य प्रशिक्षक पदासाठी रिकी पाँटिंग आणि स्टिफन फ्लेमिंग ही नवीन नावं समोर
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक (India Chief Coach) राहुल द्रविड (Rahul Dravid) हे मुदतवाढीसाठी इच्छूक नसल्याचं समजतंय. तसंच क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मण यांनाही संघाबरोबर दौऱ्यांसाठी द्यावा लागणार वेळ देता येणार नाहीए. त्यामुळे नवीन प्रशिक्षक कुणाला नेमायचं यावर आता बीसीसीआयमध्ये विचार सुरू झाला आहे. आणि भारतीय संघ तसंच इथली परिस्थिती यांचा अभ्यास असलेला एखादा परदेशी प्रशिक्षक नेमण्यावर आता विचार सुरू आहे. (India Chief Coach)

अर्थात, प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची मुदत २७ मे पर्यंत आहे. रेव्हस्पोर्ट्स या वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) आणि दिल्ली कॅपिटल्स संगाचे रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांना बीसीसीआयने संपर्क केला आहे. पण, दोघांनी नेमका कसा प्रतिसाद दिला याची कल्पना नाही. भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय मोहिमा पाहता, वर्षभर प्रवास करण्यासाठी हे दोन्ही खेळाडू तयार होतील का, हा प्रश्न आहे.

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; आणखी ३० ते ४० जण अडकल्याची भीती)

भारतीय संघाच्या प्रशिक्षकांचा इतिहास पाहिला तर जॉन राईट आणि गॅरी कर्स्टन यांच्या काळात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. परदेशात मालिका जिंकण्याची सुरुवातच या दोघांच्या काळात झाली. भारताने टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकही या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिंकले. त्यानंतर डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ मात्र वादग्रस्त आणि अपयशी ठरला. त्यानंतर बीसीसीआयने संघासाठी कायम भारतीय माजी खेळाडूच प्रशिक्षक म्हणून निवडले आहेत. (India Chief Coach)

रवी शास्त्री आणि विराट कोहली (Virat Kohli) या जोडीने आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलं यश मिळवलं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये भारतीय संघाने मालिका जिंकल्या. पण, विश्वचषक जिंकण्यात या जोडीला यश आलं नाही. तर रोहित आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) ही जोडीही प्रभावी ठरली. पण, त्यांनाही आयसीसीची स्पर्धा एकदाही जिंकता आली नाही.

नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ १ जुलै २०१४ ते ३१ डिसेंबर २०२७ इतका मोठा असेल. या कालावधीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियात मालिका खेळेल. तसंच आयसीसीची चॅम्पियन्स करंडक स्पर्धाही होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.