Manoj Jarange : “मला कधीही अटक होऊ शकते”; असं का म्हणाले जरांगे पाटील ?

कितीही दबाव टाकला तरी मराठा एक इंच देखील मागे हटणार नाही. आमचेच काही आमदार आहेत. माझी माहिती त्यांना पुरवीत आहेत. आज त्यांचं नाव मी घेणार नाही, पण असे ३६ आमदार आहेत. सत्ता आणि मराठ्यातला मी काटा आहे. म्हणून मला बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे" जरांगे म्हणाले.

246
Manoj Jarange : "मला कधीही अटक होऊ शकते"; असं का म्हणाले जरांगे पाटील ?

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा आपला दौरा सुरु केला आहे. अशात ते आज म्हणजेच मंगळावर ५ मार्च रोजी बीड (Beed) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.

(हेही वाचा – Smriti Irani : “आम्ही विकासाची, तुम्ही ४०० पारची गॅरंटी घ्या”)

माध्यमांशी बोलताना, “मला कधीही अटक होण्याची शक्यता असून, त्याबाबत अहवाल देखील तयार” असल्याचं जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील :

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, “न टिकणारे दहा टक्के आरक्षण मराठ्यांना देण्यात आले आहे. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू आहेत. सरकारने आमची फसवणूक केली आहे. सत्तेत मी काटा आहे. मला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. तसा अहवाल तयार झाला आहे.”

(हेही वाचा – Mumbai International Airport वर १.६६ कोटी रुपयांच्या सोन्यासह दोन आयफोन जप्त)

मला बाजूला सारण्याचा प्रयत्न

“सरकार आपल्यावर गुन्हे दाखल करत आहेत, आज आमच्यावर वेळ आहे. उद्या तुमची वेळ येई. मात्र कितीही दबाव टाकला तरी मराठा एक इंच देखील मागे हटणार नाही. आमचेच काही आमदार आहेत. माझी माहिती त्यांना पुरवीत आहेत. आज त्यांचं नाव मी घेणार नाही, पण असे ३६ आमदार आहेत. सत्ता आणि मराठ्यातला मी काटा आहे. म्हणून मला बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे” जरांगे म्हणाले. (Manoj Jarange)

(हेही वाचा – Bangalore NIA Raid : कैद्यांना कट्टरतावादी बनवण्याचा प्रयत्न; एनआयएचे एकाच वेळी १७ ठिकाणी छापे)

मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात :

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे सतत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. अशात आता त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधत टीका केली आहे. (Manoj Jarange)

“देवेंद्र फडणवीस यांची भाषा आता एकनाथ शिंदे देखील बोलू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांचे शब्द ऐकत आम्ही सहा महिने त्यांना वेळ दिला. पण ते देखील आता आम्हाला बोलू लागले आहेत. मर्यादा संपली की मराठा करेक्ट कार्यक्रम करत असतो. नऊ तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत, त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते घेऊ.” असे जरांगे यांनी सांगितले. (Manoj Jarange)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.