Revanth Reddy : पंतप्रधान मोदी मला मोठ्या भावासारखे ; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींचे कौतुक

"काँग्रेसची सत्ता असलेल्या तेलंगणाला केंद्राशी संघर्ष नको आहे. आम्ही ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टात योगदान देऊ इच्छितो ", असे रेड्डी म्हणाले.

258
Revanth Reddy : पंतप्रधान मोदी मला मोठ्या भावासारखे ; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी तेलंगणा दौऱ्यावर होते. त्यांनी राज्याला हजारो कोटी रुपयांची भेट दिली आहे. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही उपस्थित होते. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, असं म्हणून त्यांचे कौतुक केले. तसेच तेलंगणाची प्रगती करायची असेल तर गुजरात मॉडेलचे पालन करावे लागेल, असे रेड्डी म्हणाले. राज्याच्या विकासासाठी मदत करण्यासाठी रेड्डी (Revanth Reddy) यांनी पंतप्रधानांचा पाठिंबा मागितला.

(हेही वाचा – Mumbai International Airport वर १.६६ कोटी रुपयांच्या सोन्यासह दोन आयफोन जप्त)

काय म्हणाले मुख्यमंत्री रेड्डी ?

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) म्हणाले की, आमच्यासाठी विकास म्हणजे गरीबातील गरीबांचा विकास, दलित, आदिवासी, मागास आणि वंचितांचा विकास. जाहीर सभेला हिंदीमध्ये संबोधित करताना ते पुढे म्हणाले, “हमारे हिसाब से प्रधानमंत्री मतलब बड़े भाई. केवळ त्यांच्या मदतीनेच मुख्यमंत्री त्यांच्या राज्यांना पुढे नेऊ शकतात. जर तेलंगणाला प्रगती करायची असेल तर गुजरातप्रमाणे पुढे जायचे असेल तर तुमच्या मदतीची गरज आहे.

(हेही वाचा – Manoj Jarange : “मला कधीही अटक होऊ शकते”; असं का म्हणाले जरांगे पाटील ?)

तेलंगणाला केंद्राशी संघर्ष नको :

“काँग्रेसची सत्ता असलेल्या तेलंगणाला केंद्राशी संघर्ष नको आहे. आम्ही ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टात योगदान देऊ इच्छितो “, असे रेड्डी (Revanth Reddy) म्हणाले.

राज्याच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी निधीची विनंती :

आदिलाबाद येथील आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी (Revanth Reddy) राज्याच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी निधीची विनंती केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी आदिलाबाद येथे ५६ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ३० हून अधिक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.