Smriti Irani : “आम्ही विकासाची, तुम्ही ४०० पारची गॅरंटी घ्या”

सरकारने देशातील ८० कोटी गरीबांना मोफत अन्नधान्य वाटप केले. मोदींची गॅरण्टी म्हणजे हमखास विकासाची हमी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी येथे केले.

140
Smriti Irani : "आम्ही विकासाची, तुम्ही ४०० पारची गॅरंटी घ्या"

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या विकासाची गॅरंटी घेतली आहे. आता तुम्ही अब की बार ४०० पारची गॅरंटी घ्या असे आवाहन केंद्रीय मंत्री (Smriti Irani) स्मृती ईराणी यांनी केले. त्या सोमवार ४ मार्च रोजी नागपुरात आयोजित नमो युवा महासंमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलत होत्या. रातुम नागपूर विद्यापीठ परिसरात आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – Amit Shah आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, महायुतीच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता)

याप्रसंगी स्मृती ईराणी म्हणाल्या की,

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या १० वर्षात देशाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेले. काश्मिरातून ३७० कलम हटवण्यापासून राम मंदिर बांधण्यापर्यत आणि ५० कोटी भारतीयांची बँक खाती उघडण्यापासून तर ११ कोटींपेक्षा जास्त गरीब महिलांच्या घरी शौचालय बांधून देण्यापर्यत प्रत्येक गॅरण्टी मोदींनी पूर्ण केली आहे. आता तुम्ही “अब की बार ४०० पार”ची गॅरण्टी घ्या, असे आवाहन स्मृती ईराणी (Smriti Irani) यांनी केले.

सरकारने देशातील ८० कोटी गरीबांना मोफत अन्नधान्य वाटप केले. मोदींची गॅरण्टी म्हणजे हमखास विकासाची हमी आहे, असे प्रतिपादन (Smriti Irani) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी येथे केले.

(हेही वाचा – Manoj Jarange : मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात)

मोदींचा परिवार :

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रविवारी (३ मार्च) पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक हल्ले केले होते. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कुटुंबावरही प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर देत “मी मोदींचा परिवार आहे’ असा नवा नारा दिला आहे. आता सारा देश म्हणतोय की मी मोदींचा परिवार आहे. हा संपूर्ण देश मोदींचा परिवार असल्याचा पलटवार स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी केला.

विकसित भारतासाठी मोदींना निवडून द्या : नितीन गडकरी

यावेळी बोलताना भाजयुमोचे (भाजपा युवा मोर्चा) राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी सांगितले की, भारताची १० वर्षांपूर्वी दैन्यावस्था झाली होती. त्यावेळी देशातील युवकांनी सत्ता परिवर्तन घडवून आणल्याचे सांगितले. मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण देशात चौफेर युवा केंद्रीत विकास झाल्याचे ते म्हणाले. तर देवेंद्र फडणवीस यांनी अबकी बार ४०० पारचा संकल्प युवकांनी घ्यायचा असल्याचे सांगितले. गरीबी हटावपासून विकसित भारतापर्यतचा प्रवास मोदींच्या नेतृत्वात झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी नितीन गडकरी यांनी विकसित भारतासाठी मोदींना निवडून देण्याचे आवाहन केले. आता केवळ स्मार्ट सिटीच नाही तर स्मार्ट व्हिलेज तयार होत आहे. भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. युवकांचे भविष्य बदलण्याची ताकद फक्त मोदी आणि भाजपात आहे. मोदींना ऐतिहासिक विजय मिळवून द्या असे आवाहन गडकरी यांनी केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.