Voting Awareness: मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘मुंबई रेडिओ’चा नवा उपक्रम 

मुंबईतील प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मोहिमेतून जनजागृती साधली जात आहे .

164
Voting Awareness: मतदानच्या जनजागृतीसाठी ‘मुंबई रेडिओ’चा नवा उपक्रम 

१८ व्या लोकसभा निवडणुकीची देशभरात रणधुमाळी सुरू असून, राज्यात चौथ्या टप्प्यापर्यंत मतदान झाले असून पाचव्या टप्प्यातील प्रचारांच्या सभा सुरू आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदान समाधारक आहे, तर पाचव्या टप्प्यातील मतदान वाढण्यासाठी सरकार तर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच मुंबईमध्ये येत्या सोमवारी, २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून त्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सरकारी यंत्रणेसह खासगी स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती (Voting awareness) सुरू आहे. मुंबईकरांनी मतदानाचा मूलभूत हक्क बजावण्यासाठी रेडिओच्या (Radio Jockey Voting Awareness) माध्यमातून वेगळी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरील – सेल्फी पॉइंट येथे त्यासाठी लाइव्ह रेडिओ स्टेशनची उभारणी केली जाणार आहे.  (Voting Awareness)

(हेही वाचा – Mumbai Police दलातील ९० पोलीस हवालदारांना पदोन्नती!)

मुंबई महापालिकेसह आघाडीच्या मिर्ची मुंबई रेडिओ स्टेशनने ‘मिर्ची व्होटिंग सिग्नल’ (Mirchi voting Signal Awareness) ही मोहीम राबवण्यास – सुरुवात केली आहे. या मोहिमेतून मतदानाविषयी जनजागृतीची चळवळ राबविली जात आहे. मुंबईतील प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मोहिमेतून जनजागृती साधली जात आहे. (Voting Awareness) 

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: फिर से खेला होबे! ४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार)

मतदान जनजागृतीसाठी अर्थपूर्ण चर्चा, माहितीपूर्ण सत्रे, संवादात्मक उपक्रम राबविले जात आहेत. या मोहिमेतून मतदारांना योग्य, अचूक माहिती देतानाच त्यांना मतदानाचे महत्त्व अधिकाधिक बिंबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही मोहीम राबविताना रेडिओ जॉकी (आरजे) मुंबईकरांशी संवाद साधून त्यांना मतदानाचे अनुभव मांडण्याची संधी देत आहेत. मुंबईतील रेल्वे, बेस्टसह अन्य सर्व दैनंदिन प्रवाशांसह पादचाऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT Railway Station) परिसरात दररोज येणाऱ्या हजारो, लाखो प्रवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी मुंबई महापालिकेने संपूर्ण स्टुडिओ उभारण्याची परवानगी दिली आहे. (Voting Awareness) 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.