CM Eknath Shinde : मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणा-या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

संत मुक्ताबाई यांच्या पावन भूमीच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तालुक्यातील इतर विकासकामाचे जवळपास ७५ कोटी रुपयांच्या कामाचे मुख्यमंत्री यांनी उदघाटन केल्याचे जाहीर केले.

133
Lata Mangeshkar आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन भूमीपूजन

महाराष्ट्र शासनाचा ” शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली. शेतकऱ्यांना मदत करतांना एन.डी.आर.एफ नियमात बदल केल्याचे सांगून आता मुक्ताईनगर आणि रावेरला जोडणारा आणि तिथली भाग्य रेषा बदलणारा हा तापी नदीवरला पूल देत आहोत. तसेच संत मुक्ताईच्या पावनभूमीच्या पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.

(हेही वाचा – Pune Section 144 : पुणे शहरात संपूर्ण महिनाभर कलम १४४ लागू; कारण ..)

मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे (खडकाचे) व रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील पुलाच्या भूमीपूजनानंतर झालेल्या जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, आ. संजय सावकारे, आ. चिमणराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, माजी आ. दशरथ भांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित उपस्थित होते. (CM Eknath Shinde)

मुक्ताईनगर आणि रावेर जोडले जाणार :

मुक्ताईनगरच्या या पुलामुळे ३० ते ३५ किलोमीटरचा वळसा वाचणार असून आता मुक्ताईनगर आणि रावेर जोडले जाणार आहे. हा पुल नाबार्ड कडून केला जाणार असल्याचे सांगून या पुलासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा – Smriti Irani : “आम्ही विकासाची, तुम्ही ४०० पारची गॅरंटी घ्या”)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की;

राज्यात सगळीकडे विकासाची कामं सुरु आहेत. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राबविला जातो आहे. एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळतायत, कोणाला ट्रॅक्टर मिळतय,कोणाला घर मिळतंय, कोणाला शेती अवजारे मिळतायत अशा अनेक योजनाचा थेट लाभ दिला जात आहे. उद्योगाच्या बाबतीतही शासनाने आघाडी घेतली असून पाच हजार कोटीचे नवे उद्योग राज्यात येत आहेत. त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे. (CM Eknath Shinde)

संत मुक्ताबाई यांच्या पावन भूमीच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) यावेळी केली. तालुक्यातील इतर विकासकामाचे जवळपास ७५ कोटी रुपयांच्या कामाचे मुख्यमंत्री यांनी उदघाटन केल्याचे जाहीर केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.