Kishor Aware Murder Case : किशोर आवारे हत्या प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला पोलिसांकडून अटक

पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे अवघ्या काही तासांत हत्येतील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यश मिळवले आहे.

62
Kishor Aware Murder Case
Kishor Aware Murder Case : किशोर आवारे हत्या प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला पोलिसांकडून अटक

मावळमधील तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे (Kishor Aware Murder Case) यांची तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीमध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चार अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व कोयत्याने डोक्यात गंभीर वार केले. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले आवारे यांनी सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले होते. याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, शाम निगडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याला शनिवार १३ मे रोजी पिंपरी – चिंचवड पोलिसांकडून रात्री उशिरा अटक करण्यात आली.

(हेही वाचा – Murder : किशोर आवारे हत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल)

पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या व्यक्तींकडून गौरव हा या हत्येमागील (Kishor Aware Murder Case) मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचाच राग मनात ठेवून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.

आवारे (Kishor Aware Murder Case) यांच्या कुटुंबियांकडून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या सह त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात सुनील शेळके यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली होती. आपला या हत्येशी काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला.

हेही पहा – 

मात्र, पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे अवघ्या काही तासांत हत्येतील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यश मिळवले आहे. या घटनेतील आरोपींनी याची पोलिसांकडे कबुली दिल्याने मुख्य सूत्रधार सापडला आहे. गौरव खळदे हा या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आलं आहे. (Kishor Aware Murder Case)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.