Lok Sabha Election Phase 2: १३ राज्यातील ८८ मतदारसंघात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू!

98
New Delhi Lok Sabha Election 2024 : स्थानिक भाषेतील प्रचाराने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

देशभरात १३ राज्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात आज (२६ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील (Lok Sabha Election Phase 2) मतदान पार पडणार आहे. एकूण १२०६ उमेदवार मतपेटीतून आपले नशीब आजमावत आहेत. खरंतर आज ८९ मतदारसंघात मतदान होणार होते. मात्र मध्य प्रदेशच्या बेतूल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचे निधन झाल्यामुळे याठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. (Lok Sabha Election Phase 2)

(हेही वाचा –PM Narendra Modi : कॉंग्रेसला ओबीसी समाजाचे आरक्षण मुस्लिम समाजाला द्यायचे आहे; पंतप्रधानांचा आरोप)

राज्यात आज (Lok Sabha Election Phase 2) विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होईल. केरळ राज्यातील सर्वच्या सर्व २० मतदारसंघात मतदान पार पडेल. तर कर्नाटकातील २८ पैकी १४, राजस्थानमधील १३, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी ८, मध्य प्रदेशमधील ७, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी ५, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ३ आणि मणिपूर, त्रिपुरा, जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होणार आहे. (Lok Sabha Election Phase 2)

(हेही वाचा –उद्धव ठाकरेंच्या इंजिनामध्ये फक्त आदित्य ठाकरेंनाच जागा; संजय राऊतांना नाही; Devendra Fadanvis यांचे टीकास्त्र)

दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा आकडा वाढणार ?

सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. देशभरात एकूण सात टप्प्यात निवडणूक होत असून ४ जून रोजी निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ६३ टक्के मतदान झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यात तरी हा आकडा वाढतो का? हे पाहावे लागेल. (Lok Sabha Election Phase 2)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.