Jiocinema : आता IPL मोफत पाहता येणार नाही, हे आहे कारण… 

218
Jiocinema : आता IPL मोफत पाहता येणार नाही, हे आहे कारण... 

देशातसध्या लोकशाही निवडणुकीनचे प्रचार सभा चालू असून, तर दुसरीकडे सर्व भारतीयांसाठी प्रिय असलेल्या आयपीएल मॅचचे सामने चालू आहेत. अशातच जिओसिनेमाच्या नव्या प्रिमियम प्लॅन्समध्ये जाहिरातीचा भडिमार वगळण्यात येणार आहे. पैसे देऊन कटेंट पाहणाऱ्यांना ही सुखद बाब असेल. तसेच ४के क्वालिटीचे व्हिडिओ पाहण्याचाही आनंद घेता येणार आहे. या सबस्क्रिप्शनमध्ये एक्सक्लुजिव्ह सीरीज, चित्रपट, हॉलिवूडचे सिनेमे, मुलांसाठी असलेला कटेंट पाहता येणार आहे.  (Jiocinema)

(हेही वाचा – Sharad Pawar : पक्षातून निघून गेलेले आमदार पुन्हा येतील का? यावर शरद पवार म्हणाले….)

तसेच मोबाइल आणि टीव्हीवरही जिओसिनेमा (Jiocinema) पाहता येणे शक्य होणार आहे. विशेष ऑफरनुसार आता प्रतिमहिना २९ रुपयांना हा प्लॅन मिळत आहे. प्रचाराचा काळ संपल्यानंतर याच प्लॅनसाठी युजर्सना प्रति महिना ५९ रुपये खर्च करावे लागणार आहेत. सध्या आयपीएलचे सामने पाहण्यासाठी अनेक लोकांनी जिओ सिनेमा ॲप (Jiocinema app) घेतलेले आहे. त्यामुळे त्यांना थेट यापुढे आयपीएलचे (IPL) सामने मोफत पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Jiocinema)

जिओसिनेमाकडून कौटुंबिक प्लॅनचीही (Jiocinema Family plan) घोषणा करण्यात आली आहे. प्रतिमहिना ८९ रुपये खर्च करून हा ‘फॅमिली प्लॅन’ घेता येणार आहे. प्रचाराचा काळ संपल्यानंतर या प्लॅनची किंमत प्रतिमहिना १५९ रुपये इतकी केली जाणार आहे. या प्लॅनचा फायदा असा की, एकाच वेळी चार डिव्हाईसवर जिओसिनेमा ओटीटीचा आनंद घेता येणार आहे.  (Jiocinema)

आयपीएल सध्या तरी मोफतच असणार का ?

जिओसिनेमाच्या निवेदनानुसार आयपीएल सध्यातरी मोफत पाहता येणार आहे. तसेच इतर भारतीय सिनेमे आणि मालिका सध्या मोफत पाहता येणार आहेत. ज्यामध्ये जाहिरातीही दिसतील. वायोकॉम १८ डिजिटलचे सीईओ किरण मनी (Kiran Mani, CEO of Viacom 18 Digital) म्हणाले, “आम्ही संपूर्ण भारतासाठी एक करमणुकीचे साधन म्हणून या उत्पादनाकडे पाहत आहोत. त्यामुळे व्यवसायापेक्षाही आमचे ध्येय भारताला आणि भारतातील जिओसिनेमाच्या वापरकर्त्यांना करमणुकीचा एक वेगळा आनंद देण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे विधान किरण मनी यांनी केले. (Jiocinema)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.