Lok Sabha Election 2024: ‘तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज’, मोदींनी केलं युवा आणि महिलांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील ८ लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून मतदान होत आहे.

70
Lok Sabha Election 2024: 'तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज', मोदींनी केलं युवा आणि महिलांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन

संपूर्ण देशभरामध्ये शुक्रवार, (२६ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान (Lok Sabha Election 2024) पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi Tweet) मराठी भाषेमध्ये युवा आणि महिलांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी युवा आणि महिलांना मतदानाचा नवा विक्रम निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. देशभरामध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा उत्साह दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, आज मतदान (Voting) होत असलेल्या, मतदारसंघामधील सर्वांना विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते. विशेषतः आपल्या युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज!, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. (Lok Sabha Election 2024)


(हेही वाचा – ईशान्य मुंबईत MNS लागली पक्ष बांधणीच्या कामाला, कोटेंचांना निवडून आणण्याचा केला निर्धार)

महाराष्ट्रात ८ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील ८ लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून मतदान (maharashtra Election) होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंत्रणा सज्ज आहे. राज्यातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, हिंगोली, यवतमाळ-वाशीम, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. ८ मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढाई होत आहे. नांदेड मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाची कसोटी पणाला लागली आहे, तर अकोल्यातून निवडणूक लढत असलेले वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.