Murder : किशोर आवारे हत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल 

गेल्या सहा महिन्यांपासून किशोर आवारे हे शेळके यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत होते.

50

मावळमधील तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची  तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीमध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चार अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व कोयत्याने डोक्यात गंभीर वार केले. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले आवारे यांनी सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले होते. याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, शाम निगडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमटणे येथील टोल नाक्याचा विषय त्यांनी मागील काही दिवसांपासून लावून धरला होता. चुकीच्या पद्धतीने हा टोलनाका सोमाटणे गावाच्या हद्दीत उभारण्यात आला असून तो बेकायदेशीर टोलनाका हटवा या मागणीसाठी त्यांनी आंदोलन देखील केले होते. मात्र हत्येमागील कारण नेमके काय आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. किशोर आवारेंच्या आईने धक्कादायक आरोप केले होते. त्यांच्या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता महत्त्वाची महिती समोर आली आहे की, आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, शाम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आवारे यांच्या आईने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा मुलगा किशोर हा सामाजिक काम करत होता. त्याचे काम सुनील शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खटकत होते. कारण शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कामाच्या विरोधात आवारे नेहमीच आंदोलन, निदर्शने करत होते. त्यातून त्यांनी ही हत्या केली. तर गेल्या सहा महिन्यांपासून किशोर आवारे हे शेळके यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत होते. असा आरोप आवारे यांच्या आईने पोलिसांत देखल केलेल्या आरोप पत्रामध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा Karnataka Election Results 2023 : भाजपाला धक्का; काँग्रेस पक्षाची आघाडी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.