Karnataka Election Results 2023 : काँग्रेसच्या विजयानंतर बेळगावात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; पोलिसांत तक्रार दाखल

हिंदू संघटनांच्या सदस्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी करत पोलिसांसमोर धरणे आंदोलन केले.

238
Karnataka Election Results 2023
Karnataka Election Results 2023 : काँग्रेसच्या विजयानंतर बेळगावात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; पोलिसांत तक्रार दाखल

कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Election Results 2023) २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा (Karnataka Election Results 2023) शनिवार १३ मे रोजी निकाल लागला. यामध्ये भाजप पक्षाला धक्का बसला असून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत (Karnataka Election Results) काँग्रेसने १३५ जागांवर विजय प्राप्त करत भाजपाचा पराभव केला. या विजयानंतर काँग्रेस समर्थकांनी अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. या जल्लोषाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावरून शेअर करण्यात येत आहेत. अशाच काही व्हिडीओ मध्ये पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(हेही वाचा – Karnataka Election Results 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या काँग्रेसला शुभेच्छा!)

बेळगावमधील टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या समोर मतमोजणी केंद्राबाहेर काही अज्ञातांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकही उपस्थित होते. (Karnataka Election Results 2023)

हेही पहा – 

हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांच्या सदस्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी करत पोलिसांसमोर धरणे आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करत आयपीसी कलम १५३ अंतर्गत एफआयआर दाखल करून पुढील तपासास सुरुवात केली आहे. (Karnataka Election Results 2023)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.