Akola Violence: अकोला मध्ये दोन गटांत हाणामारी; कलम १४४ लागू

एका व्यक्तीनं सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे ही दंगल भडकल्याचं बोललं जात आहे.

171
Akola Violence
Akola Violence: अकोला मध्ये दोन गटांत हाणामारी; कलम १४४ लागू

अकोला शहरात (Akola Violence) शनिवार १३ मे २०२३ रात्री उफाळली मोठी दंगल झाली. दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याने विशिष्ठ समुदायाच्या जमावानं धुडगूस घालण्यास सुरुवात केल्यावर पोलिसांनी जवळजवळ दीड तास कुठलीही कारवाई न केल्याने परिस्थिती अजून बिघडली. या हिंसाचारात एकाच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या हिंसाचारात (Akola Violence) वाहनांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली.

(हेही वाचा – ATS : एटीएसची मोठी कारवाई; शिक्षक, इंजिनिअर आणि जिम ट्रेनर निघाले दहशदवादी)

अकोल्यातील (Akola Violence) हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर सेतू येथे शहरातील एक गट आला आणि त्यांनी संपूर्ण भागात दगडफेक आणि जाळपोळ करत दहशत पसरवण्यास सुरुवात केली. या हिंसाचारात (Akola Violence) दोन्ही गटातील एकूण १० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

या हिंसाचारानंतर (Akola Violence) जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम १४४ लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही पहा – 

एका व्यक्तीनं सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे ही दंगल भडकल्याचं बोललं जात आहे. या व्यक्तीवर रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. (Akola Violence)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.