Vice President : भारताच्या राज्यकारभाराची पद्धत संपूर्ण जगाला हेवा वाटणारी – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

या कार्यक्रमाला विविध प्रशासकीय सेवांमधील अनेक सेवानिवृत्त तसेच विद्यमान ज्येष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

140
Vice President : भारताच्या राज्यकारभाराची पद्धत संपूर्ण जगाला हेवा वाटणारी - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

पारदर्शकता, जबाबदारी, डिजिटलीकरण, नवोन्मेष आणि उद्यमशीलता यावर लक्ष केंद्रीत करणारी भारताच्या राज्यकारभाराची पद्धत संपूर्ण जगाला हेवा वाटावी अशी आहे, असे उपराष्ट्रपती (Vice President) जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. ‘रिफ्लेक्शन्स ऑन इंडियाज पब्लिक पॉलिसीज’ (भारताच्या सार्वजनिक धोरणांवर पडलेले प्रतिबिंब) या १९८४ च्या तुकडीतील सनदी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे शनिवार १३ मे रोजी नवी दिल्लीत उपराष्ट्रपती भवनात त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना संबोधित करत त्यांचे कौतुक केले आहे. (Vice President)

सनदी (प्रशासकीय) सेवा हा राज्यकारभाराचा कणा असून सरकारची धोरणे संपूर्ण देशभरात राबवण्यात या सेवेने मूलभूत भूमिका बजावली आहे, असे उपराष्ट्रपती (Vice President) जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. समाजातील असुरक्षित घटकांचे सक्षमीकरण करुन उन्नती साध्य करणे, यशस्वी योजनांद्वारे प्रभावीपणे शक्य झाले आहे आणि त्यामुळे अगदी उपेक्षितातील उपेक्षित नागरिकांना देखील अत्यावश्यक सेवांचा लाभ मिळू शकतो, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – Akola Violence: अकोला मध्ये दोन गटांत हाणामारी; कलम १४४ लागू)

राष्ट्राला अभिमान वाटेल, देशातील नागरिकांचा सन्मान वाढेल अशी देशसेवा करण्याचे आवाहन, उपराष्ट्रपती धनखड यांनी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी केले. व्यक्तिगत आकस न बाळगता लोकसेवा तसेच नागरी कामे करणे, अगदी तळागाळापर्यंत कायदा आणि सुव्यवस्था राबवणे लोकांशी व्यवहार करताना प्रामाणिक राहणे, कर्तव्याप्रति स्वतःला झोकून देणे आणि धोरणपूर्तीची ठरवलेली उद्दिष्टे गाठताना कार्यक्षमता दाखवणे हीच राष्ट्राला अभिमान वाटणारी लोकांचा सन्मान वाढवणारी देशसेवा आहे असे त्यांनी यावेळी विशद केले. (Vice President)

एक आगळेवेगळे मौलिक राष्ट्रीय मनुष्यबळ म्हणून सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका उपयुक्त ठरु शकते, ही बाब धनखड यांनी यावेळी अधोरेखित केली. “आपल्या संवैधानिक संस्था आणि लोकशाही मूल्यांवर चुकीच्या पद्धतीने शिंतोडे उडवून त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी, देशांतर्गत आणि देशाबाहेरून होत असलेल्या असत्य कथन आणि देशविरोधी कारवायांचा, आपले सेवानिवृत्त सनदी अधिकारी तटस्थपणे उत्कृष्ट प्रतिवाद करु शकतात, असे उपराष्ट्रपतींनी निदर्शनाला आणून दिले. (Vice President)

हेही पहा – 

लोकशाही राज्यव्यवस्थेपुढे स्वतःची अशी वेगळी आव्हाने आहेत हे मान्य करत उपराष्ट्रपतींनी सनदी अधिकाऱ्यांना, कायदा आणि संविधानाची राजवट राबवण्यासाठी खंबीर आणि दृढ बांधिलकी दाखवण्याचे आवाहन केले. “देशाच्या काही भागांमध्ये सत्ताधारी पक्षांसोबत अधिकार्यांचे असलेले राजकीय साटेलोटे संघराज्य व्यवस्थेच्या उदात्त हेतुला मोठी बाधा पोहोचवत आहे. याकडे सर्व संबंधितांनी तातडीने पद्धतशीर लक्ष पुरवणे आवश्यक आहे, ” असेही त्यांनी स्पष्ट केले. (Vice President)

सार्वजनिक धोरणाच्या विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या देशासमोरील काही अत्यंत गंभीर समस्यांना तोंड देण्याबाबत, 1984 च्या तुकडीतील दहा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मतप्रवाह, दृष्टीकोन आणि विश्लेषणे, ‘रिफ्लेक्शन्स ऑन इंडियाज पब्लिक पॉलिसीज’ या पुस्तकात एकत्र पहायला मिळतात. या कार्यक्रमाला विविध प्रशासकीय सेवांमधील अनेक सेवानिवृत्त तसेच विद्यमान ज्येष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.