-
कल्याण, प्रतिनिधी
KDMC मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया सारख्या किटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण, कंटेनर तपासणी, डास उत्पत्ती स्थळांचा शोध, हस्तपत्रके वाटप आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. (KDMC)
(हेही वाचा – ‘महाराष्ट्र माझा मराठी माझी’साठी BJP चा पुढाकार; अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी कार्यशाळा सुरू)
महापालिका क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या असून पाणी साचणार नाही याची दक्षता, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवणे आणि डास उत्पत्ती होणार नाही यासाठी स्वच्छता बंधनकारक करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर केडीएमसी अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई होणार आहे. गृहनिर्माण संस्थांनाही परिसर स्वच्छ ठेवणे, टाक्या-कंटेनर तपासणे आणि साचलेले पाणी त्वरित हटविणे बंधनकारक आहे. खासगी रूग्णालये व प्रयोगशाळांना संशयित रूग्णांची माहिती वेळेत महापालिकेकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (KDMC)
(हेही वाचा – भूतानमध्ये तिरंग्याचा डंका; Thimphu Open Karate 2026 मध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्ण लयलूट)
नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी महानगरपालिकेची रूग्णालये, दवाखाने, नागरी आरोग्य केंद्रे, आरोग्यवर्धिनी केंद्रे, तसेच आपला दवाखाना येथे आवश्यक औषधसाठा, अत्यावश्यक किट आणि बेडची पुरेशी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया व इतर साथीच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी सर्वसमावेशक साथरोग कृती आराखडा तयार करण्यात आला असून आरोग्य, घनकचरा व वैद्यकीय यंत्रणा समन्वयाने सर्वेक्षण, औषध फवारणी व तात्काळ प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित केली आहे. घर व परिसरात पाणी साचू देऊ नये, कूलर-टाक्या-ड्रम स्वच्छ ठेवावेत आणि ताप, अंगदुखी, डोकेदुखीची लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जावे, असे आवाहन मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. (KDMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

