‘महाराष्ट्र माझा मराठी माझी’साठी BJP चा पुढाकार; अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी कार्यशाळा सुरू

१६ ऑगस्ट नंतर प्रमाणपत्र अनिवार्य; कल्याण जिल्हा वाहतूक आघाडीचा उपक्रम

79
BJP workshop for Marathi language training for auto drivers.
'महाराष्ट्र माझा मराठी माझी'साठी BJP चा पुढाकार; अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी कार्यशाळा सुरू
  • कल्याण, प्रतिनिधी

BJP             मराठी भाषा अनिवार्यतेच्या दिशेने भाजपाने मोठे पाऊल उचलले आहे. डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार आणि भाजपा प्रणित रिक्षा चालक/मालक संघटनेचे कार्याध्यक्ष तथा भाजपा वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी अमराठी ऑटो रिक्षा-टॅक्सी परवानाधारकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. (BJP)

(हेही वाचा – Atul Save : दिव्यांग शाळांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कोंडी फुटणार; थकीत वेतनाचे अधिकार थेट जिल्हा स्तरावर!)

कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या सहकार्याने परिवहन विभागाच्या महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा प्रशिक्षणांतर्गत ही कार्यशाळा घेतली जात आहे. एकूण चार वर्ग घेऊन अमराठी भाषिक चालकांना मराठीचे ज्ञान दिले जाणार असून कार्यशाळा पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. परिवहन विभागाने १६ ऑगस्ट नंतर तपासणी दरम्यान हे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे. प्रमाणपत्र नसल्यास संबंधितावर कारवाई होणार आहे. तसेच भविष्यात रिक्षा पासिंग आणि परवाना नूतनीकरणासाठीही हे प्रमाणपत्र उपयोगी पडणार आहे. या कार्यशाळेचा पहिला वर्ग बुधवारी पार पडला. (BJP)

(हेही वाचा – Pune Akashwani विभाग बंद होणार? ‘त्या’ उलटसुलट चर्चांना पूर्णविराम; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले…)

कार्यशाळेला माजी मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे गटनेते शशिकांत कांबळे, उत्तर आघाडी अध्यक्ष नागेंद्र शर्मा, कल्याण आरटीओचे प्रशांत सूर्यवंशी, तसेच रिक्षा संघटनेचे पदाधिकारी रवी जाधव, किशोर सोरखांदे, प्रमोद गुरव, जयनाथ यादव, अरविंद कोचरेकर, संतोष आतकरे, संजय प्रजापती, बाबू एकनाथ, दीपक पवार, यांच्यासह रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.