El Nino अधिक तीव्र झाल्याने बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाचा धोका, प्रशासन सतर्क; तज्ज्ञांचे मत काय?

19
El Nino अधिक तीव्र झाल्याने बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाचा धोका, प्रशासन सतर्क; तज्ज्ञांचे मत काय?
El Nino अधिक तीव्र झाल्याने बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाचा धोका, प्रशासन सतर्क; तज्ज्ञांचे मत काय?

El Nino भारताला सध्या दोन मोठ्या हवामान धोक्यांचा इशारा देण्यात आला आहे. पॅसिफिक महासागरात एल निनो अधिक तीव्र होत आहे, तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यांच्या मते, जर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची प्रणाली अधिक तीव्र होऊन तिचे चक्रीवादळात रुपांतर झाले, तर त्याला ‘अर्णब’ असे नाव दिले जाईल. ही प्रणाली २० ते २५ सप्टेंबरदरम्यान सक्रीय होण्याची शक्यता आहे.

यामुळे ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशसह अनेक किनारपट्टीच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा धोका वाढला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये आधीच दुष्काळ आणि कमी पावसाचा धोका निर्माण झाला आहे. या दोन्ही धोक्याच्या एकत्रित गंभीर परिणाम भारतीय हवामानावर होऊ शकतो, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

हेही वाचा –Appleमध्ये दुसऱ्यांदा कर्मचारी कपात, Fitness+ टीममधील कर्मचाऱ्यांना फटका

अर्णब चक्रीवादळ
भारतीय हवामान विभागाच्या (IMD)अंदाजानुसार, अंदमान समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील दोन दिवसांत अधिक तीव्र होईल. यामध्ये २१ सप्टेंबरला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र, २२ सप्टेंबर रोजी खोल कमी दाबाच्या रुपांतर होऊ शकते. २३ सप्टेंबरपर्यंत ते आंध्र प्रदेश-दक्षिण ओडिशा किनारपट्टीजवळ पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. याची तीव्रता वाढली तर त्याचे अर्णब चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. सध्याची हवामानाची परिस्थिती अशी आहे की, ही प्रणाली वेगाने विकसित होऊ शकते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

मुसळधार पावसाची शक्यता कोणत्या राज्यात ?
– २४ सप्टेंबर रोजी छत्तीसगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
– २४ आणि २५ सप्टेंबर रोजी विदर्भामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
– अंदमान आणि निकोबार बेटे आणि गंगा खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्ये २० ते २६ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पाऊ पडण्याची शक्यात आहे.

प्रशांत महासागरातील एल निनो अधिक तीव्र झाल्यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये दुष्काळ आणि उपासमारीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे सामान्यतः मान्सून कमकुवत होतो आणि उष्णता वाढते. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळी प्रणालीमुळे किनारपट्टीच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

दोन्ही परिस्थिती एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे हवामानाची स्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. काही भागांमध्ये पाण्याची टंचाई वाढू शकते, तर किनारपट्टीच्या भागात पुरासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा दुहेरी धोका शेती, मत्स्यव्यवसाय आणि किनारपट्टीवरील लोकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो.

हवामान विभाग या प्रणालीवर सतत लक्ष ठेवून आहे. पुढील ५-६ दिवस अनेक भागांमध्ये पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवरील राज्यांच्या प्रशासनांना आगाऊ तयारी करण्याचा सल्ला दिला जात आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला जाऊ शकतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.