-
कल्याण, प्रतिनिधी
Thimphu Open Karate 2026 भूतानची राजधानी थिम्फू येथे ६ आणि ७ जून रोजी झालेल्या तिसऱ्या थिम्फू ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय कराटेपटूंनी दमदार कामगिरी केली. भूतान ऑलिम्पिक कमिटीने आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील खेळाडू सहभागी झाले होते. भारतीय खेळाडूंनी अनेक सुवर्णपदके पटकावून देशाचा गौरव वाढविला. (Thimphu Open Karate 2026)
(हेही वाचा – नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी ‘मास्टर ट्रेनर’ सज्ज होणार; मंत्री Akash Fundkar यांनी मांडला ‘वर्क प्लॅन’)
आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक सेन्सेई राहूल रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी कौशल्याचा उत्तम आविष्कार घडवला. अंडर-१२ गटात वेद विकास कुमार याने काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावून दुहेरी यश मिळवले. अंडर-१६ गटात दुर्वेश विजय पाटील आणि वंश प्रशांत गौर यांनीही काता व कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदके जिंकत भारताच्या यशात मोलाचा वाटा उचलला. (Thimphu Open Karate 2026)
(हेही वाचा – Shivsena : शिवसेना कधी आणि कशी फुटली? पहिले बंड कधी झाले?)
खेळाडूंच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना प्रशिक्षक राहूल रंजन म्हणाले, हे यश खेळाडूंच्या कठोर मेहनत, शिस्त आणि समर्पणाचे फळ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही कामगिरी नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल. या उल्लेखनीय यशाबद्दल खेळाडूंच्या कुटुंबीयांनी, क्रीडाप्रेमींनी आणि कराटे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. (Thimphu Open Karate 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

