Japan’s Moon Mission : चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये जपान पाचव्या स्थानी; पण …

मून स्नाइपर जपानच्या जाक्सा, नासा आणि युरोपियन एजन्सीने संयुक्तपणे विकसित केले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जपानच्या तांगेशिमा स्पेस सेंटरमधील योशिनोबू कॉम्प्लेक्समधून याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. या मोहिमेसाठी ८३१ कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे.

172
Japan’s Moon Mission : चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये जपान पाचव्या स्थानी; पण ...

जपानने आपले मून स्नाइपर अंतराळ यान यशस्वीरित्या चंद्रावर (Japan’s Moon Mission) उतरवून इतिहास रचला आहे. यासह, चंद्रावर यशस्वीपणे अंतराळ यान पाठवणारा जपान हा पाचवा देश ठरला आहे. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया, भारत आणि चीनला चंद्रावर लँडिंग करता आले आहे.

(हेही वाचा – Astronaut Buzz Aldrin : चंद्रावर पाय ठेवणारे दुसरे अंतराळवीर बझ एल्ड्रिन)

जपानी अंतराळ संस्था जाक्साने सांगितले की त्यांनी लँडिंगसाठी 6000×4000 क्षेत्राचा शोध घेतला. जाक्साने (Japan’s Moon Mission) आपली स्लिम मून मोहीम त्याच भागात उतरवली. अंतराळ संस्थेने सांगितले की शोधलेल्या भागात अंतराळ यान उतरवणे हे त्यांचे लक्ष्य होते. ठरवलेल्या जागेत यान उतरलं असलं तरीही जपानसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : राज्यात ७५ लाखाहून आधिक घरात पोहोचल्या अक्षता; गर्भगृहात पूजाविधीसाठी ११ जोडप्यांची निवड)

लँडरवर असलेला सौर ऊर्जा सेलमध्ये बिघाड –

जपानने २० जानेवारीला मध्यरात्री चंद्राच्या पृष्ठभागावर (Japan’s Moon Mission) हा उपग्रह उतरविला. जपानी अंतराळ संस्था जक्साने दिलेल्या माहितीनुसार ‘स्लिम’ या यानाने चंद्राच्या शियोली क्रेटरनजीकची माहिती पाठविण्यास सुरुवात केली आहे. परंतु, लँडरवर असलेला सौर ऊर्जा सेलमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे पुरेशी वीज निर्मिती होऊ शकत नाहीय, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हे अंतराळ यान प्रक्षेपित करण्यात आले –

मून स्नाइपर (Japan’s Moon Mission) जपानच्या जाक्सा, नासा आणि युरोपियन एजन्सीने संयुक्तपणे विकसित केले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जपानच्या तांगेशिमा स्पेस सेंटरमधील योशिनोबू कॉम्प्लेक्समधून याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. या मोहिमेसाठी ८३१ कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे.

(हेही वाचा – Mumbai Festival 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे उद्घाटन)

इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज अंतराळ यान –

जपानने ज्या भागात आपले अंतराळ (Japan’s Moon Mission) यान उतरवले आहे ते क्षेत्र चंद्राच्या ध्रुवीय भागात आहे. इथे खूप अंधार आहे. या स्थळाचे नाव शिओली क्रेटर आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, त्याचे अंतराळ यान प्रगत ऑप्टिकल आणि प्रतिमा प्रक्रिया तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

गेल्या वर्षी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 यशस्वीरित्या उतरवून इतिहास रचला. भारताच्या भारत आणि रशियानेही त्यांची लूना-25 ही चांद्र मोहीम सुरू केली होती, जी अयशस्वी ठरली. (Japan’s Moon Mission)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.